Health Tips : हवामानातील बदल आणि थंडी सुरू झाल्याने दिल्ली आणि एनसीआरसह अनेक भागात वायू प्रदूषणाची (Air Pollution) पातळी वाढू लागली आहे. वाढता धोका लक्षात घेता दिल्ली-एनसीआरमध्ये जीआरएपीचा पहिला टप्पा सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. यामुळे फुफ्फुसाचा संसर्ग, दमा आणि ब्राँकायटिससारखे आजार होतात. गरोदर महिला आणि लहान मुलांना प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असतो. यापुढे गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. कारण येत्या काळात प्रदूषणाची पातळी वाढणार आहे. त्यामुळे आत्ताच काळजी घेणं गरजेचं आहे.

  


या संदर्भात असोसिएट डायरेक्टर आणि मॅक्स हॉस्पिटल्स, ऑरा स्पेशॅलिटी क्लिनिकचे संचालक डॉ. रितू सेठी म्हणतात, वायू प्रदूषणात वाढ झाल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्या लोकांना आधीच श्वसनाचे आजार आहेत त्यांना जास्त धोका असतो.


विशेषत: गरोदर महिला आणि बालकांना वाढत्या प्रदूषणामुळे अधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या प्रदूषण फारसे नसले तरी आगामी काळात त्यात वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत आतापासून संरक्षण घेणे आवश्यक आहे. जर आपण प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण केले नाही तर गर्भवती महिलेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


गर्भवती महिलांना धोका आहे


डॉ. रितू शेठी सांगतात की, वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गरोदर महिलांना श्वसनाचा त्रास होतो. ज्या महिलांना आधीच दमा आहे, त्यांचा आजार अचानक वाढू लागतो. दम्याचा झटका नसला तरी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 


वाढत्या प्रदूषणाचा परिणाम गर्भवती महिलेच्या बाळावरही होतो. काही प्रकरणांमध्ये, अकाली जन्माचा धोका देखील असतो. अशा परिस्थितीत महिलांना वायू प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.


अशा प्रकारे स्वतःचे रक्षण करा.



  • श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.

  • सकाळी घराबाहेर पडू नका.

  • जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • रोज सकाळी योगा करा.

  • जास्त प्रदूषण असेल तर मास्क लावूनच बाहेर पडा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : डोळ्यांची दृष्टीही निरोगी राहील, चष्माही लागणार नाही; फक्त 'या' टिप्स फॉलो करा