Health Tips : नुकताच जागतिक रजोनिवृत्ती दिन (World Menopause Day 2022) साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिलांना मुक्तपणे जगण्यासाठी सक्षम बनविण्याच्या हेतूने जागतिक आरोग्यसेवा अग्रणी कंपनी अॅबॉट नेतृत्व करीत आहे. इप्सॉससोबत सहयोगासह अॅबॉटने नुकत्‍याच केलेल्‍या सर्वेक्षणानुसार 87 टक्‍के व्‍यक्‍तींना वाटते की, रजोनिवृत्तीचा महिलेच्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होतो. रजोनिवृत्ती हा एक असा टप्पा आहे, ज्याचा परिणाम सर्व महिलांवर त्‍यांच्‍या वयानुसार होतो. याबाबत महिलांमध्‍ये जागरुकता वाढविणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे अॅबॉटचे ध्येय आहे.


या संदर्भात सांगताना डॉ. पै म्‍हणाले, ‘’रजोनिवृत्तीदरम्यान शरीरात कसे बदल होतात आणि महिला अस्वस्थ लक्षणांचे व्यवस्थापन कसे करू शकतात हे समजून घेणे त्यांना या परिवर्तनाशी सामना करण्‍यास मदत करण्यासाठी, त्यांचे दीर्घकालीन आरोग्य व जीवनाची गुणवत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे.


अॅबॉट इंडियाचे प्रादेशिक वैद्यकीय संचालक डॉ. पराग शेठ म्‍हणाले, ‘’अॅबॉटमध्‍ये आम्‍ही महिलांना दीर्घायुष्य आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. रजोनिवृत्ती अनेक महिलांसाठी आव्हानात्मक असू शकते. आम्ही महिलांच्या रजोनिवृत्तीच्या अनुभवांबद्दल जागरुकता वाढवत आहोत, ज्‍यामुळे महिलांना रजोनिवृत्ती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल, त्याबद्दल बोलण्यास अधिक सोयीस्कर वाटू शकेल आणि त्यांना जीवनाच्‍या या टप्‍प्‍यामध्‍ये पूर्णपणे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा मिळेल. आमच्या प्रयत्नांच्‍या माध्‍यमातून आम्ही महिलांना त्यांच्या जीवनातील हा नवीन अध्याय स्वीकारण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत.”


अॅबॉटच्‍या द नेक्‍स्‍ट चॅप्‍टरमधील रजोनिवृत्ती गाथांचे संकलन ई-बुक म्हणून उपलब्ध आहे. ज्‍यामध्‍ये भारत, चीन, ब्राझील आणि मेक्सिको या चार देशांमधील रजोनिवृत्ती महिलांचे वास्‍तविक अनुभव आणि गाथांचा समावेश आहे. या ई-बुकमध्ये हार्मोनल बदलांचा नाते आणि करिअरवरील परिणामापासून आरोग्य आणि महिला सक्षमीकरणापर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. 


रजोनिवृत्ती म्हणजे काय?  


स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. रजोनिवृत्तीमुळे हार्मोन्‍समध्‍ये होणारे बदल सामान्‍यत: महिलांच्‍या वयाच्‍या चाळीशीमध्‍ये सुरूवात होते. सरासरी भारतीय महिला पाश्चिमात्‍य देशांमधील महिलांच्‍या तुलनेत जवळपास पाच वर्ष लवकर रजोनिवृत्तीचा अनुभव घेतात. पाश्चिमात्‍य देशांमधील महिला जवळपास वयाच्‍या 46व्‍या वर्षी रजोनिवृत्ती अनुभवतात. यामुळे अनेक शारीरिक, मानसिक आणि लैंगिक लक्षणे उद्भवू शकतात. 


सर्वेक्षणामधून रजोनिवृत्तीबाबत निदर्शनास आलेल्या गोष्टी :


अॅबॉटच्‍या सर्वेक्षणामध्‍ये सात शहरांमधील 1,200 हून अधिक व्‍यक्‍तींकडून माहिती घेण्‍यात आली. या सर्वेक्षणाचा जागरूकतेचे प्रमाण, समज आणि रजोनिवृत्ती दरम्‍यान महिलांना येणाऱ्या अनुभवांचे मूल्‍यांकन करण्‍याचा उद्देश होता. या सर्वेक्षणामध्‍ये 45 ते 55 वर्षे वयोगटातील महिला, तसेच कुटुंबातील सदस्‍यांचा समावेश होता. 


1. 82 टक्‍के प्रतिसादकांचा विश्‍वास आहे की, रजोनिवृत्तीचा महिलांच्‍या वैयक्तिक आरोग्‍यावर परिणाम होऊ शकतो. अनेकांचा असा देखील विश्‍वास आहे की, रजोनिवृत्तीचा त्‍यांचे लैंगिक जीवन (78 टक्‍के), कौटुंबिक जीवन (77 टक्‍के), सामाजिक जीवन (74 टक्‍के) आणि कामकाज जीवन (81 टक्‍के) यावर देखील परिणाम होतो. 


2. जवळपास 48 टक्‍के महिलांनी विविध रजोनिवृत्ती लक्षणे अनुभवल्‍याचे सांगितले, जसे कमी प्रमाणात रक्तस्त्राव (59 टक्‍के), नैराश्य (56 टक्‍के), संभोग करताना वेदना (55 टक्‍के) आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव (53 टक्‍के). 


3. जवळपास 84 टक्‍के प्रतिसादकांना वाटते की रजोनिवृत्तीदरम्‍यान महिलांमध्‍ये अनेक बदल होतात, ज्‍यामुळे कुटुंबांनी त्‍यांची अधिक काळजी घेतली पाहिजे. तसेच, इतरही बाबी निदर्शनास आल्या आहेत. 


रजोनिवृत्तीबाबत चर्चेला पाठिंबा देण्‍याच्‍या उद्देशाने अॅबॉट या कंपनीने महिलांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी ‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’ ही मोहिम आजपासून सुरू केली आहे. भारतात कथांचे हे संकलन माजी मिस युनिव्‍हर्स लारा दत्ता, तसेच द फेडरेशन ऑफ ऑब्‍स्‍टेट्रिक अॅण्‍ड ग्‍यानेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (एफओजीएसआय)चे नियुक्‍त अध्‍यक्ष प्रख्‍यात स्‍त्रीरोगतज्ञ ऋषिकेश पै, अपोलो आणि फोर्टिस हॉस्पिटल्‍सच्‍या कन्‍सल्‍टण्‍ट एण्‍डोक्रिनोलॉजिस्‍ट डॉ. तेजल लेथिया आणि शीदपीपलच्‍या संस्‍थापिका शैली चोप्रा यांच्‍या उपस्थितीत सादर करण्‍यात आले.