मुंबई : संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच जगभरात या जीवघेण्या व्हायरसवर अनेक संशोधनं केली जात आहेत. असंच एक संशोधन पोर्तुगालमध्ये करण्यात आलं. पोर्तुगालमधील संशोधकांनी दावा केला आहे की, सरासरी पुरूष, महिलांच्या तुलनेत कोरोना व्हायरस अॅन्टीबॉडिज जास्त तयार करू शकतात. संशोधकांचं म्हणणं आहे की, 90 टक्के रुग्णांमध्ये सार्स-कोव-2 व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 7 महिन्यांनी अॅन्टीबॉडू आढळून आल्या आहेत. युरोपीय जर्नल ऑफ इम्युनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, अॅन्टीबॉडीच्या स्तराचा वयाशी कोणताही संबंध नाही. परंतु, रोगाचं गांभीर्य खूप महत्त्वाची आहे.


मानवी रोगप्रतिकारक शक्तीव सार्स-कोव-2 ला ओळखते


पोर्तुगालमध्ये मेडिसिना मॉलिक्यूलर आण्विक जोआओ लोब एंट्यून्स पासून मार्क वल्डोवेननुसार, 'मानवी रोगप्रतिकारक शक्ती सार्स-कोव-2 ला हानिकारक व्हायरसच्या स्वरूपात ओळखतो. आणि त्यानंतर याचं उत्तर म्हणून अॅन्टीबॉडीचं उत्पादनही करतो. जे व्हायरसशी लढण्यासाठी फायदेशीर ठरतं.'


कोविड रुग्णालयातील 300 हून अधिक रुग्णांवर संशोधन


दरम्यान, संशोधकांनी कोविड-19 रुग्णालयातील 300 हून अधिक रुग्ण आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे अॅन्टीबॉडी स्तर आणि 200 हून अधिक कोविड-19 मधून बरे झालेल्या स्वयंसेवकांची निरिक्षणं नोंदवली होती.


पुरुषांमध्ये अॅन्टीबॉडीचं उत्पादन जास्त


गेल्या 6 महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर 3 आठवड्यांतच अॅन्टीबॉडीच्या स्तरात वेगाने वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यामध्ये कमतरता झाल्याचंही दिसून आलं. संशोधकांनी सांगितलं की, कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात जास्त अॅन्टीबॉडी तयार होतात. परंतु, काही महिन्यांनी महिला, पुरुष दोघांच्याही शरीरात अॅन्टीबॉडी स्तर समान पातळीवर दिसून येतो.'