Health: ऑक्टोबर महिना संपत आला आहे, काही भागात हिवाळ्याची चाहूल लागली असून थंडीची सुरूवात झाली आहे. काही दिवसातच हिवाळा पूर्णपणे सुरू होईल. अशा या बदलत्या वातावरणामुळे विविध आजार, रोगराई आपलं डोकं वर काढतात, ज्यामुळे सर्दी-खोकल्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत स्वत:ला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. काहीजण जराही सर्दी-खोकला झाला तरी लोक थेट औषधं घ्यायला सुरूवात करतात, हे टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुमची खूप मदत होऊ शकते.


घरगुती उपायांनी सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवा


सध्या देशात हवामान बदलत आहे. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या गोष्टीही येतात. तुम्हालाही यापैकी कोणताही संसर्ग होण्याची भीती वाटत असेल, तर आतापासून या घरगुती उपायांची मदत घेणे सुरू करा.


आलं घालून चहा- जर तुम्हाला सर्दी आणि खोकला या दोन्हींचा त्रास होत असेल तर चहामध्ये आले घालून प्यायला सुरुवात करा.


आल्याचा काढा- तुम्हाला हवे असल्यास आल्याचा काढा बनवूनही पिऊ शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला एका पॅनमध्ये पाणी गरम करावे लागेल, त्यानंतर त्यात आल्याचे छोटे तुकडे टाका आणि उकळवा. तुम्ही ते जसे आहे तसे पिऊ शकता किंवा मध घालून देखील पिऊ शकता. आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तुम्हाला फ्लू, सर्दी आणि खोकल्याशी लढायला मदत करतात.


कोमट पाण्याने गुळण्या करा - घसा दुखत असेल तर कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास फायदा होईल. असे केल्याने ऊब मिळेल आणि घशातील जंतूही नष्ट होतील.


हळदीचे दूध प्या - बदलत्या हवामानात हाडे आणि स्नायू दुखण्याचा त्रास होत असेल तर हळद टाकून उकळून दूध प्या. हे करण्यासाठी तुम्हाला कच्ची हळद, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी पावडर दुधात मिसळून चांगले उकळावे लागेल. अशाप्रकारे तयार केलेले हळदीचे दूध कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही, तापामध्येही ते पिणे फायदेशीर आहे.


तुळस-आल्याचा काढा प्या - हा काढा बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करा, नंतर त्यात काळी मिरी, लवंग, दालचिनी, आले आणि तुळशीची पाने टाका आणि 5 ते 7 मिनिटे उकळवा. यानंतर मध मिसळून ते गरम प्या.


नाकात तेल घाला- जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, तर तुम्ही नाकात मोहरीचे तेल किंवा शुद्ध देशी तूप घालू शकता. यासाठी तुम्हाला यापैकी कोणतीही गोष्ट आधी थोडीशी गरम करून घ्यावी लागेल, त्यानंतर त्याचे थेंब नाकात टाकावे लागतील. असे केल्याने नाक आणि घशाच्या संसर्गापासून आराम मिळतो.


आवळा ज्यूस प्या- हा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.


मास्क आवश्यक- घराबाहेर पडताना मास्क वापरा.


स्वच्छता- घरामध्ये आणि आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी घ्या, बाहेरचे अन्न खाणे टाळा.


हायड्रेशन- हायड्रेटेड राहा, दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या.


 


 


 


 


हेही वाचा>>>


Fitness: काय सांगता! रोज व्यायाम करणाऱ्यांपेक्षा, वीकेंडला वर्कआऊट करणारे लोक 'फिट'? अभ्यासातून माहिती समोर, तज्ज्ञ सांगतात..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )