Health: दिन दिन दिवाळी..गायी-म्हशी ओवाळी...चिवडा, लाडू, करंजी, चकली.. अशा विविध खास अन् खमंग पदार्थांचं सेवन यानिमित्ताने केले जाते. अवघ्या सणांचा हंगाम सुरू झाला आहे. एकामागून एक सण आयुष्यात आनंद आणत आहेत. पण या सगळ्या आनंदात तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसात येत आहे. यासोबतच धनत्रयोदशी, देवदिवाळी, भाऊबीज येणार आहेत. अशावेळी प्रत्येक घरात मिठाई आणि पदार्थ बनवले जातात किंवा बाजारातून विकत घेतले जातात. घरगुती पदार्थांमुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, म्हणून आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही सणासुदीच्या काळात मधुमेह नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखू शकता. जाणून घेऊया सण-उत्सवात मधुमेह कसा नियंत्रणात ठेवायचा?
बेकरीचे पदार्थ टाळा
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वप्रथम केक, बिस्किटे, पेस्ट्री यांसारख्या बेकरीत बनणाऱ्या पदार्थांपासून दूर राहावे लागेल. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. याशिवाय यामध्ये असलेल्या ट्रान्स फॅट्समुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत मधुमेहावर नियंत्रण मिळवायचे असेल तर या गोष्टींपासून दूर राहणे खूप गरजेचे आहे.
तळलेले पदार्थ टाळा
सणांच्या काळात, समोसे आणि पकोड्यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि अस्वास्थ्यकर चरबी असते, ज्यामुळे वाढत्या वजनासोबतच हृदयविकाराचाही बळी जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, सणासुदीच्या काळात रक्तातील साखरेची चिंता करायची नसेल, तर या गोष्टींचे सेवन टाळावे.
रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासा
सणासुदीच्या काळात मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहावी. हे तुम्हाला तुमचे शरीर आहार आणि औषधांवर कशी प्रतिक्रिया देत आहे हे समजण्यास मदत करते.
व्यायाम करायला विसरू नका
सणांच्या काळात व्यायाम करायला विसरू नका. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि अतिरिक्त कॅलरीजही बर्न होतात. जर तुम्हाला जिममध्ये जाता येत नसेल तर घरीच हलका व्यायाम करा किंवा थोडा वेळ फिरा.
औषधांची काळजी घ्या
सण-उत्सवाच्या काळात मधुमेही रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबरोबरच औषधांची विशेष काळजी घ्यावी. औषधे घेण्यामध्ये थोडीशी निष्काळजीपणा देखील तुमची रक्तातील साखरेची पातळी खराब करू शकते, म्हणून तुमची औषधे नेहमी वेळेवर घ्या.
हेही वाचा>>>
Health: 'सणासुदीच्या दिवसानंतर झोप अवश्य घ्या, अन्यथा होईन नुकसान!' कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल, तज्ज्ञ म्हणतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )