Health: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत माणसाला विविध आजार होताना दिसतात. सध्या जगभरात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढतंय. त्यात पोटाचा कर्करोग हा एक अत्यंत गंभीर आणि प्राणघातक आजार आहे. जो दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना आपला बळी बनवत आहे. ज्याला गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. हा कर्करोग तुमच्या पोटाच्या पेशींमध्ये सुरू होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा आजार हळूहळू आणखी तीव्र होतो आणि बरा होण्याची शक्यता कमी होते. पोटाच्या कर्करोगाची काही सामान्य कारणे म्हणजे आपल्या रोजच्या सवयी. जाणून घ्या..


हळूहळू शरीराच्या इतर भागात पसरतो


आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा काही गोष्टी करतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यवर होताना दिसतो. काही प्रकरणांमध्ये, पोटाचा कर्करोग आढळून येतो, पोटाचा कर्करोग जो पोटाच्या पेशींमध्ये वाढतो किंवा शरीराच्या इतर भागात पसरतो, त्यावर उपचार करणे कठीण आहे. 


पोटाच्या कर्करोगाची कारणं


पोटाचा कर्करोग, ज्याला गॅस्ट्रिक कर्करोग देखील म्हणतात, हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो पोटाच्या पेशींमध्ये सुरू होतो. हा आजार पोटाच्या वेगवेगळ्या भागात होऊ शकते आणि जसजसा तो वाढतो तसतसा तो जवळच्या अवयवांना देखील नुकसान पोहोचवू शकते. याची काही सामान्य कारणे म्हणजे आपल्या रोजच्या सवयी. समजून घेऊया...


पोटाच्या कर्करोगाची सामान्य कारणे


ताण


टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, तणावामुळे मानसिक दबाव वाढतो. याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होतो. तणावामुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाचे आजार देखील होऊ शकतात. तणावामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, त्यामुळे पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तणाव व्यवस्थापनासाठी योग आणि ध्यानाची मदत घ्यावी.



जास्त मीठ


जेवणात जास्त मीठ घेतल्यानेही पोटाचा कर्करोग होऊ शकतो. जास्त खारट पदार्थ खाल्ल्याने पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता 41% वाढते. तज्ज्ञांच्या मते, जास्त खारट अन्न खाल्ल्याने सोडियमचे प्रमाण वाढते, जे पोटाच्या कर्करोगाला प्रोत्साहन देते. यासाठी तुम्हाला तुमच्या जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करावे लागेल.


धूम्रपान


धूम्रपानामुळे केवळ फुफ्फुसांनाच हानी पोहोचत नाही तर ते पोटाच्या कर्करोगाचेही कारण आहे. धूम्रपानामुळे पोटात अल्सर होतो, त्यामुळे पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. जे लोक दिवसातून अनेक सिगारेट ओढतात त्यांना पोटात अल्सर होण्याची शक्यता असते, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.


खराब आहार


जे लोक जास्त जंक फूड, मसालेदार किंवा लाल मांस खातात त्यांनाही पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते, ज्यामुळे लठ्ठपणाही वाढतो. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करू शकता.


मद्यपान


जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना असे वाटते की दिवसातून 1 किंवा 2 पेये कोणतेही नुकसान करणार नाहीत, तर तुमची धारणा बदला. एवढी दारू देखील तुम्हाला कॅन्सर पेशंट बनवू शकते. दारू प्यायल्याने पोटाच्या आतील भिंती खराब होतात आणि ॲसिडिक रिॲक्शन होऊ लागतात. म्हणून, मद्यपान पूर्णपणे कमी करणे किंवा बंद करणे चांगले होईल.


पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे



  • वजन कमी होणे

  • पोटदुखी

  • भूक न लागणे

  • छातीत जळजळ आणि अपचन

  • थकवा आणि अशक्तपणा


 


हेही वाचा>>>


Men Health: ...म्हणून पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होतेय? का वाढतेय वंध्यत्वाची समस्या? तज्ज्ञ म्हणतात..


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )