Health: अनेकदा असं होतं, जेव्हा रात्री झोपल्यानंतरही अचानक जाग येते. ज्यानंतर बराच वेळ झोप लागत नाही. तर असे हे का होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. जर तुम्हाला रात्री अचानक जाग येत असेल आणि ती सुद्धा एका विशिष्ट वेळेत.. तर ही आरोग्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. कारण तुम्हाला रात्री 3-4 च्या दरम्यान जाग येत असेल तर ही सामान्य समस्या नाही. ही एक गंभीर समस्या असू शकते, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक गंभीर आजार होऊ शकतात. याबद्दल सर्व काही जाणून घेऊया...


तुमच्यासोबत असे दररोज होत असेल तर...


अनेक वेळा रात्री झोपताना अचानक जाग येते. हे अधूनमधून घडणे सामान्य आहे, परंतु जर तुमच्यासोबत असे दररोज होत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण असे रोज घडणे सामान्य नाही. हे भविष्यात काही गंभीर आजाराचे थेट संकेत आहे. मात्र, अनेक वेळा लोक वाईट स्वप्न पडले किंवा चुकीच्या स्थितीत झोपलो असे सांगून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून तुमचा विचार ताबडतोब बदला, कारण दररोज सकाळी 3 ते 4 या वेळेत उठणे हे गंभीर आजारांचे लक्षण आहे, जे वेळीच समजून घेतले पाहिजे. वारंवार झोपेचा त्रास होण्याचे कारण काय आहे आणि चांगल्या झोपेसाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.


रक्तातील साखर वाढण्याचे सर्वात सामान्य लक्षण


सोशल मीडिया एन्फ्लुएंसर तज्ज्ञ डेव्ह एस्प्रे सांगतात की, सकाळी 3 ते 4 वाजता उठणे हे शरीरातील रक्तातील साखर वाढण्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. याव्यतिरिक्त, कॉर्टिसॉल आणि तणाव देखील यावेळी लोकांना जागृत करण्यास कारणीभूत ठरतात.


3 ते 4 वाजता झोप का मोडते?


वय- वाढत्या वयामुळे हा सिंड्रोम काही लोकांमध्ये होतो, ज्यामध्ये त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. वास्तविक, वयानुसार, या वयोगटातील लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल होतात, ज्यामुळे झोपेचे चक्र बिघडते.


औषधे- औषधांच्या प्रभावामुळे झोपेचे चक्रही बिघडते. काही औषधांचे साइड इफेक्ट्स असे असतात की ते घेतल्यानंतर लगेच झोप येऊ लागते. अशा स्थितीत जेव्हा रात्री झोपण्याची वेळ येते तेव्हा झोप येत नाही.


तणाव- दीर्घकालीन तणावाचा झोपेवर सर्वाधिक परिणाम होतो. यामध्ये रात्री 3 ते 4 दरम्यान लोकांची झोप उडते. तणावामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा देखील कमी होऊ शकते. याशिवाय यकृत खराब होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये निद्रानाशाचाही समावेश होतो. परंतु या वस्तुस्थितीची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही.


चांगल्या झोपेसाठी या टिप्स फॉलो करा



  • झोपेची आणि उठण्याची वेळ सेट करा, दररोज एकाच वेळी झोपा.

  • झोपण्यापूर्वी फोन आणि गॅझेट वापरणे पूर्णपणे टाळा.

  • रात्री हलके अन्न खावे.

  • झोपण्याच्या 4 ते 5 तास आधी कॉफी आणि चहा प्या.

  • मद्यपान आणि धूम्रपानामुळे झोपेवरही परिणाम होतो.


 


हेही वाचा>>>


Men Health: सावधान! लॅपटॉपमुळे शुक्राणूंची संख्या कमी होतेय? कारण जाणून घ्या, कसं टाळाल?


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )