Health: तर्रीदार मटण..झणझणीत चिकन..मटण सुख्खा.. काय मांसाहारींनो...तोंडाला पाणी सुटलं ना..? असे अनेक मांसाहारी आहेत, ज्यांना दिवसातून एकदा तरी मांसाहारी पदार्थ खाणे पसंत करतात. आपण जे खातो त्यातून आपल्या शरीराला पोषण मिळते, त्यामुळे खाण्याच्या चांगल्या सवयी महत्त्वाच्या आहेत. पण तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, मांसाहारामुळे माणसांमध्ये टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतोय. एका संशोधनातून ही बाब समोर आलंय..


जगभरातील लाखो लोक मधुमेहाने ग्रस्त


सध्या भारतातील बहुतांश लोकसंख्या मधुमेहाने ग्रस्त आहे, तथापि, केवळ भारतच नाही तर जगभरातील लाखो लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की मांसाहारामुळे मानवांमध्ये टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढत आहे. हे संशोधन 20 देशांतील लोकांवर करण्यात आले आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे मांस खाल्ल्याने टाइप-2 मधुमेह कसा वाढत आहे हे समोर आले आहे. मांसाहार हे असे अन्न आहे की ते खाल्ल्याने अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते, पण मांसाहारामुळे मधुमेहाचा धोका वाढतो का? अभ्यासात काय म्हटलंय? ते जाणून घ्या.


संशोधनात ही बाब समोर 


या अभ्यासातून मांस पोल्ट्री असो वा प्रक्रिया केलेले मांस, त्यांचे सेवन मधुमेहाला प्रोत्साहन देत आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज 50 ग्रॅम प्रक्रिया केलेले मांस, 100 ग्रॅम प्रक्रिया न केलेले लाल मांस किंवा 100 ग्रॅम पोल्ट्री मीटचे सेवन करतात ते सहजपणे मधुमेहाचे शिकार होऊ शकतात.


3 प्रकारच्या मांसावर केलेला अभ्यास


अभ्यासासाठी मांसाच्या तीन श्रेणी तयार केल्या होत्या, ज्यात खालील गोष्टींचा समावेश होतो: प्रथम, प्रक्रिया केलेले मांस जसे की गोमांस, डुकराचे मांस आणि बकरीचे; दुसरे म्हणजे, प्रक्रिया न केलेले मांस म्हणजे खारवून वाळवलेले डुकराचे मांस, हॉट डॉग आणि सॉसेज, जे बर्गर, सँडविच आणि स्नॅक्समध्ये सर्वाधिक वापरले जातात; आणि तिसरा प्रकार म्हणजे पॉल्ट्री मीट, ज्यामध्ये चिकन, टर्की आणि बदकाचे मांस समाविष्ट आहे. ते जगातील बहुतेक देशांमध्ये खाल्ले जातात, विशेषतः लाल मांस, जे इतर सर्व मांसांमध्ये सर्वात हानिकारक मानले जाते.


लाल मांस अधिक धोकादायक?


लाल मांस खाल्ल्याने मधुमेहासोबतच शरीराला इतर अनेक प्रकारची हानी होऊ शकते. या मांसामुळे मधुमेह टाइप-2 चा धोका सर्वात वेगाने वाढू शकतो. संशोधनानुसार, डायबिटीज टाईप-2 चे जवळपास 1 लाख रुग्ण लाल मांस खात होते. हे रुग्ण अमेरिका, ब्रिटन, ब्राझील आणि मेक्सिकोसारख्या इतर अनेक देशांतील लोक आहेत. जर तुम्ही प्रक्रिया केलेले लाल मांस खाल्ले तर ते ताबडतोब खाणे बंद करा, कारण लाल मांसामध्ये आधीपासूनच मधुमेहाचे गुणधर्म आहेत. जर रासायनिक उत्पादने वेगळ्या प्रक्रियेदरम्यान वापरली गेली तर हे मांस आणखी हानिकारक होते.


हेही वाचा>>>


Diwali 2024 Make-Up: दिवाळी पूजेसाठी अवघ्या काही मिनिटातच व्हाल तयार! 5 मिनिटं-5 मेकअप ट्रिक्स! दिसाल सुंदर, उशीर होणार नाही


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )