Health: माणसाचे सर्व अवयव योग्य रितीने कार्य करत असतील तर तो व्यक्ती निरोगी असतो असे म्हटले जाते. म्हणून आपल्या प्रत्येक अवयवाची काळजी घेणं आवश्यक आहे. खरं तर, आपल्या शरीराचे सर्व अवयव खूप महत्वाचे आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की कुठलाही माणूस हातपाय शिवाय जगू शकतो? शरीराचा कोणताही भाग खराब झाला तरी माणूस जिवंत राहतो, परंतु शरीराचा असा एक भाग आहे की, त्याला इजा झाली तर माणूस लगेच मरतो. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांवर सर्वात आधी परिणाम होतो. काही अवयव असे असतात, ज्यांना इजा झाली की ते परत वाढतात. जसे की त्वचा, केस आणि नखे. त्यांना शरीराचे पुनरुत्पादक अवयव म्हणतात. असं म्हणतात व्यक्तीचे दात हे मृत्यूनंतर चितेत जाळल्यानंतरही सुरक्षित राहतात. तो अवयव कोणता आहे? ज्याचा संबंध थेट मृत्यूशी आहे, जाणून घेऊया.


तो अवयव काय आहे ते जाणून घ्या


शरीरातील सर्व क्रिया मेंदूच्या आदेशानुसार होतात. हे नाकातून ऑक्सिजन काढण्याचे आणि हृदयातून शरीरात रक्त पंप करण्याचे काम नियंत्रित करते. एखाद्याची मान कापली तर त्या व्यक्तीचा त्वरित मृत्यू होतो. कारण जर मान कापली गेली तर हृदय किंवा रक्त संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवू शकणार नाही किंवा ते परत खेचू शकणार नाही. मान नसल्यामुळे मेंदूचा शरीराशी असलेला संपर्क तुटतो. यामुळे इतर अवयवांना आदेश देणे किंवा कार्य करणे थांबवेल.


मानेला इजा झाल्यानंतरच मृत्यू का होतो?


जेव्हा मान कापली जाते तेव्हा तात्काळ मृत्यूचे कारण म्हणजे ते मेंदू आणि हृदयाचे कार्य थांबवते. आपले मन शरीराला कोणत्याही प्रकारे आदेश देण्यास सक्षम नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयाची धडधड थांबते. शरीराचा कुठलाही भाग कापला गेला तर तिथे होणारा रक्तस्राव थांबवून माणसाला मृत्यूपासून वाचवता येते. पण मानेच्या बाबतीत ते फार कठीण आहे.


हेही वाचा>>>


Health: ब्लीडिंग Eye व्हायरसपासून सावधान! डोळ्यातून वाहते रक्त? जगभरात पसरतोय धोका, ही लक्षणं तुम्हाला नाही ना?


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )