Health: सँडविच, बर्गर आणि मोमोज... तोंडाला पाणी सुटलं असेल.. या पदार्थांसोबत मिळणारे सॉसेजही त्यांची चव वाढवतात. आजकाल फास्ट फूडमध्ये मेयोनीजचा वापर सर्वाधिक वाढत आहे. विविध फास्ट फूडसोबत मेयोनिजचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जात असले तरी त्याचे अनेक दुष्परिणामही समोर आले आहेत. अलीकडेच हैदराबादमध्ये दूषित मेयोनीज खाल्ल्याने 100 हून अधिक लोक आजारी पडले. तर एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर तेलंगणा सरकारने कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजवर बंदी घातली आहे.
एका वर्षाची बंदी
तेलंगणा सरकारने तत्काळ निर्णय घेत एका वर्षासाठी मेयोनिजचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. मेयोनिजबाबत अन्नातून विषबाधा झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे सातत्याने येत होत्या. राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला
मिळालेल्या माहितीनुसार लोक आजारी पडल्यानंतर तेलंगणा सरकारने याबाबत तपासणी केली होती. ज्यामध्ये असे आढळून आले की, जे लोक आजारी पडले आहेत त्यापैकी बहुतेकांनी रस्त्यावरील अन्न खाल्ले आहे. हे अन्न विषारी होते. प्रशासनाकडून तपास करण्यात आला तेव्हा कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजचा वापर स्ट्रीट फूडमध्ये केल्याचे समोर आले. त्यामुळे ते विषारी झाले. अशावेळी डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मेयोनीज लगेच तयार करून खाल्ल्यास ते ठिक असते, पण ते बराच वेळ ठेवले तर त्यात रासायनिक क्रिया होते आणि बॅक्टेरियामुळे अन्न दूषित होऊ शकते.
मोमोज खाल्ल्याने मृत्यू?
अलीकडेच हैदराबादमधील सिंगाडाकुंटा कॉलनीत राहणाऱ्या रेश्मा बेगम या महिलेचा मोमोज खाल्ल्याने मृत्यू झाला. या प्रकरणातही मेयोनिज दूषित असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे अलवल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोथकुंटा येथील एका ग्रिल हाऊसमध्ये शॉरमा खाल्ल्याने २० हून अधिक लोकांची प्रकृती बिघडली. या सर्व प्रकारात खराब मेयोनीज समोर आले आहे.
मेयोनिज म्हणजे काय?
अंडयातील बलक तेलात मिसळून मेयोनेझ हा जाड क्रीमी सॉस तयार केला जातो. अनेकदा त्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रसही वापरला जातो. हे फास्टफूड किंवा सँडविच, सॅलड्स, स्नॅक्ससह सॉस म्हणून वापरले जाते.
हेही वाचा>>>
Health: काय प्रकार! Love Bites मुळे होऊ शकतो मृत्यू? जास्त दबावाने ब्रेन स्ट्रोकचा धोका? आरोग्य तज्ज्ञ म्हणतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )