Health: सध्या महाराष्ट्रासह भारतातील विविध भागात हवामान खूपच थंड झाले आहे. किंमान तापमानाचा पारा खाली घसरताना दिसतोय. देशाच्या उत्तरेकडील भागात तर थंडीने कहर केला आहे. थंडीच्या लाटेमुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आरोग्याची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागेल. आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार हे थंड वारे थेट आपल्या फुफ्फुसांवर हल्ला करतात, ज्यामुळे फुफ्फुसाचे आजार वाढतात. सर्दी, खोकला किंवा कफ या समस्या फुफ्फुसांशी संबंधित आहेत, ज्या या ऋतूमध्ये अधिक आढळतात. याशिवाय, जगासाठी एक नवीन धोका निर्माण होत आहे, ज्याचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. हिवाळ्यात फुफ्फुसाच्या आजारांची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया.
हिवाळ्यात फुफ्फुसाचे आजार का वाढतात?
आरोग्य अहवालानुसार, हिवाळ्यात फुफ्फुसाच्या आजाराचा धोका वाढण्याचे कारण म्हणजे थंड वारे आणि सूर्यप्रकाशाचा अभाव. कमी सूर्यप्रकाशामुळे संसर्गाचा धोका वाढतो. सूर्यप्रकाशामुळे श्वसनाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. थंडीच्या मोसमात प्रदूषण आणि धुक्यामुळे फुफ्फुसाचे आजारही होऊ शकतात. दमा, सायनस, सर्दी या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना हिवाळ्यात फुफ्फुसात संसर्ग होण्याची समस्याही असते.
थंडीत या समस्या वाढतात
- कोरडा खोकला
- तीव्र डोकेदुखी किंवा डोक्यात जडपणा
- स्नायू दुखणे
- उलट्या-पोटदुखी
- ताप येणे
- कफ निर्मिती
- छातीत जडपणा आणि वेदना
सध्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन विषाणू HMPV मध्ये अशीच लक्षणे आहेत. हा देखील फुफ्फुसाच्या संसर्गाचा आजार आहे, जो कोरोनासारखाच आहे. ज्याप्रमाणे आजपासून 5 वर्षांपूर्वी कोरोनाने जगभरातील लोकांना लक्ष्य केले होते, त्याच पद्धतीने या नवीन विषाणूच्या प्रसाराचा अंदाज वर्तवला जात आहे. भारताने अशा परिस्थितीसाठी आधीच तयारी केली असली, तरी अशा संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आपणही अगोदरच तयारी केली पाहिजे. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे शरीर तंदुरुस्त ठेवणे.
आराम कसा मिळेल?
स्वामी रामदेव सांगतात, फुफ्फुसाचे आजार टाळण्यासाठी काही घरगुती उपाय. ज्यामध्ये योगासनांना अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. ते ताडासन करण्याची शिफारस करतात. श्वासोच्छवासाचे व्यायाम करा, ज्यामुळे श्वसन संक्रमणाचा धोका कमी होतो. भुजंगासन केल्याने फुफ्फुसाचे आरोग्यही चांगले राहते. प्राणायाम करणे देखील फायदेशीर ठरेल. हिवाळ्यात उपलब्ध असलेली कच्ची हळदही तुम्ही खाऊ शकता, आल्याचे सेवन करणेही फायदेशीर आहे.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो.. चुकूनही नका करू दुर्लक्ष! धोका वाढतोय, कॅन्सरची 'ही' 10 लक्षणं, अनेकांना माहित नसावी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )