Health : आपण अनेकदा पाहतो. काही लोकांना कॉफी इतकी प्रिय असते, की ते काम करताना, जेवल्यानंतर, किंवा काही तासाभरानंतर कॉफीचे सेवन करतात. अनेक ऑफिसमध्ये तर काही लोकांना तासन्-तास काम करत बसावे लागते. परंतु हे काम करत असतानाच ही लोकं तिथेही अक्षरश: काही न खाता पिता कॉफी पित असतात. आज आम्ही कॉफी प्रेमींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. अलीकडेच एका अभ्यासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, कॉफी पित तासनतास बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका 60 टक्क्यांनी कमी होतो. नेमकं काय कारण आहे? जाणून घ्या..



कॉफीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी, एका अभ्यासातून माहिती समोर


बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात कॉफी पिण्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत, ज्यामध्ये अशा लोकांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना जेवणाअभावी तासनतास एका जागी बसून राहावे लागते. अमेरिकेतील प्रौढ व्यक्तींवर करण्यात आलेला हा अभ्यास अनेक अर्थांनी अतिशय खास मानला जातो, तसेच कॉफीप्रेमींसाठी देखील एक आनंदाची बातमी म्हणून समोर आली आहे.



10 हजारांहून अधिक लोकांवर अभ्यास


या अभ्यासात 10 हजारांहून अधिक अमेरिकन प्रौढ व्यक्तींचा समावेश होता, जे कॉफी पिऊन तासनतास काम करायचे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक कॉफी पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत कॉफी न पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची शक्यता 1.6 पट जास्त असल्याचं समोर आलं. त्याच वेळी, जे लोक दिवसाचा बराचसा वेळ एकाच ठिकाणी बसून घालवतात आणि कॉफी घेत नाहीत, त्यांच्या मृत्यूचा धोका 60 टक्क्यांपर्यंत जास्त असल्याचं समोर आलं. या अभ्यासात असं सुचवण्यात आलं की, कॉफी प्यायल्याने जे लोक आपला बराचसा वेळ एकाच ठिकाणी बसून व्यतीत करतात. त्यांच्या मृत्यूचा धोका कमी होतो.



टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो


दीर्घकाळ एकाच ठिकाणी काम करत असताना शरीर सक्रिय ठेवण्यासाठी काही लोकांना कॉफीचे सेवन करायला आवडते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म खराब जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कमी करतात. दिवसातून 2 कप कॉफी फक्त तुमचा मेंदू सुधारत नाही तर मृत्यूचा धोका देखील कमी करते. विशेषत: ज्यांच्याकडे शारीरिक हालचाल कमी आहे त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरू शकते. याचे दीर्घकाळ सेवन केल्याने हृदयविकार आणि टाइप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होऊ शकतो. असं अभ्यासात म्हटलंय


 


हेही वाचा>>>


Health : सावधान! हे 3 'सायलेंट-किलर' आजार ठरू शकतात जीवघेणे, तुम्हाला तर लक्षणं नाही ना?


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )