Health: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाने ग्रासलंय. ज्यामुळे झटपट वजन कमी करण्याच्या नादात विविध डाएट फॉलो केले जातात. ते ही डॉक्टरांच्या कोणत्याही सल्ल्याशिवाय... सध्या फिटनेस ट्रेंड सुरू असल्याने शरीरात किती कॅलरीज गेल्या, याची मोजणी केली जाते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कॅलरीजबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. प्रत्येक माणसाला कॅलरीजची गरज असते. यातूनच आपल्याला शक्ती आणि पुरेसे पोषण मिळते. मात्र जास्त कॅलरीज घेणे देखील चांगले नाही. जास्त कॅलरीजमुळे वजन वाढू शकते. भारतात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढते. भारतीय लोकांनी एका दिवसात किती कॅलरीज खाव्यात हे जाणून घेऊया...


 


कॅलरी घेण्याबाबत लोकांची धारणा बदलली


अलीकडच्या काळात कॅलरी घेण्याबाबत लोकांची धारणा बदलली आहे. आता लोक कॅलरी मोजण्याकडे अधिक लक्ष देतात. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते त्यांच्या अन्नातून कॅलरीजचे प्रमाण कमीत कमी ठेवतात. त्याच वेळी, ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे, त्यांच्या कॅलरीजची संख्या जास्त असते. कॅलरीज शरीरासाठी आवश्यक आहेत, कारण ते आपल्या शरीराला शक्ती आणि पोषण प्रदान करतात. परंतु शरीरात कॅलरीजचे प्रमाण सामान्य असणे आवश्यक आहे, कारण जास्त कॅलरीज खाल्ल्याने समस्या देखील वाढू शकतात.


 


कॅलरी महत्त्वाच्या का आहेत?


इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, डॉ. कार्तिगाई सेल्वी यांनी सांगितले की, कॅलरी हे आपण जे पदार्थ खातो त्यातून निर्माण होणारे एकक आहे. हे शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या कार्यामध्ये मदत करते, जसे की चालणे, फिरणे किंवा इतर कोणतेही काम करणे. अपुऱ्या कॅलरीजमुळे हृदय, यकृत, किडनीसह अनेक अवयव प्रभावित होतात. गंभीर परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.


 


कॅलरी संख्या म्हणजे काय?


तज्ज्ञांच्या मते, शरीराच्या ऊर्जेसाठी 1 कॅलरी आवश्यक आहे, परंतु आपण सामान्यतः कॅलरीज कमी करण्याबद्दल जे बोलतो ते प्रत्यक्षात 1 किलो कॅलरीजच्या संदर्भात बोलतो. 1 किलो कॅलरी ही शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात कॅलरी असते.


 


इतर तज्ज्ञांचे मत?


काही इतर आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की, कॅलरीजची संख्या ही व्यक्ती एका दिवसात किती शारीरिक क्रिया करते यावर अवलंबून असते. त्यांच्या मते, जे पुरुष कमी शारीरिक हालचाली करतात त्यांना 1,800 ते 2,000 kcal आवश्यक असते. तर स्त्रीला 1,400 ते 1,600 kcal आवश्यक असते. याव्यतिरिक्त, तज्ज्ञ असेही म्हणतात की शरीराची रचना आणि वजन देखील कॅलरीज निर्धारित करतात.


 


शरीरात जास्त कॅलरीज असल्यास काय होईल?



  • शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढल्याने वजन वाढू शकते.

  • कॅलरीज वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

  • जास्त कॅलरीजमुळे माणसांमध्ये आळशीपणाची समस्या वाढते. 


 


कॅलरीज कसे कमी करावे?


चरबीचे सेवन कमी करा.
व्यायाम करा.
अन्न आणि पेयांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी करा.
जास्त पाणी प्या.


 


हेही वाचा>>>


Fitness Tips: करिश्मा कपूरनेही एकेकाळी तब्बल 25 किलो वजन कमी केले होते, आता दिसते नवतरुणी काश्मिरी! फिटनेस सीक्रेट जाणून घ्या


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )