Health: आजच्या काळात विज्ञान इतकं विकसित झालंय की, ज्या जोडप्यांना मूल होत नाही, त्यांच्यासाठी विविध तंत्रज्ञानाचे माध्यम उपलब्ध आहेत. ज्यांना नैसर्गिकरित्या मूल होत नाही, अशा लोकांना बाळ होण्यासाठी IVF चा अवलंब करणे आजकाल सामान्य झाले आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का? की जर जोडप्यांना पालक बनायचे असेल तर त्यांनी एका गोष्टीपासून दूर राहावे? यावर केलेल्या संशोधनाविषयी सर्व काही जाणून घेऊया.


IVF - जोडप्यांसाठी एक नवीन आशा


प्रत्येक विवाहित जोडप्याचे पालक होण्याचे स्वप्न असते. जे नैसर्गिक मार्गाने पालक बनू शकत नाहीत, ते IVF चा अवलंब करतात. IVF ने जोडप्यांसाठी एक नवीन आशा आणली आहे, जी त्यांना पालक बनण्यास मदत करते. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे, ज्याच्या मदतीने पती-पत्नी पालक बनू शकतात. IVF अनेक वर्षांपूर्वी आला होता, त्याच्या मदतीने सामान्य लोक आणि सेलिब्रिटी देखील पालक बनतात. एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की जे लोक गर्भधारणेचे नियोजन करत आहेत, विशेषत: IVF च्या मदतीने त्यांनी एका गोष्टीपासून दूर राहणे आवश्यक आहे. कोणती आहे ती गोष्ट? जाणून घ्या..


नव्या संशोधनात काय म्हटलंय?


अमेरिकेच्या एमोरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे, ज्यामध्ये त्यांना असे आढळून आले आहे की बाहेरील वायू प्रदूषणामुळे मानवी गर्भाच्या विकासावर परिणाम होतो. संशोधनानुसार, जेव्हा एखादी स्त्री अंडाशय तयार करते किंवा पुरुष शुक्राणू तयार करतो, त्या वेळी जर ते जास्त प्रदूषणाच्या संपर्कात आले तर त्याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो. यानंतर गर्भाचा योग्य विकास होत नाही. प्रदूषणामध्ये कार्बनचे कण असतात, जे दृश्यमान नसतात, परंतु हवेद्वारे शरीरात प्रवेश करतात. प्रदूषणाचे हानिकारक कण गर्भधारणेच्या आरोग्यावर परिणाम करतात.


तब्बल 915 लोकांवर संशोधन


संशोधन पथकाने केलेल्या संशोधनात 915 लोकांचा समावेश केला होता. त्यांच्या चाचणीचे नमुने तपासले असता असे आढळून आले की, ज्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता वायुप्रदूषणाच्या संपर्कात आली असता त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता इतरांपेक्षा वाईट आढळली. या सर्व पुरुषांना आयव्हीएफद्वारे पिता बनायचे होते.


तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा सल्ला


संशोधन टीममध्ये उपस्थित असलेल्या तज्ज्ञांनी सांगितले की, जे गर्भधारणेचे नियोजन करत आहेत, त्यांनी आयव्हीएफची मदत घेण्यापूर्वी त्यांचा परिसर आणि तेथील प्रदूषणाची पातळी देखील तपासली पाहिजे. स्वच्छ आणि शुद्ध वातावरणात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 


हेही वाचा>>>


Weight Loss: महिन्याभरात शरीरातील चरबी विरघळेल, वजन होईल कमी, फक्त रात्रीच्या जेवणानंतर या 5 गोष्टी करू नका..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )