Health: दिवाळी (Diwali 2024) अवघ्या काही दिवसांवरच आलीय. या निमित्त प्रत्येकाच्या घरी या आनंदोत्सवाची जय्यत तयारी सुरू झालीय. सध्या हा सणासुदीचा काळ आहे. आणि हे दिवस मिठाई शिवाय अपूर्णच म्हणावे लागतील. कारण दसरा असो किंवा दिवाळी.. या काळात लोकांच्या घरी मिठाई बनवली जाते किंवा विकत आणली जाते. मधुमेही रुग्णांसाठी बाजारात शुगर फ्री मिठाई देखील उपलब्ध आहे, जी कृत्रिम गोड पदार्थांपासून बनविली जाते. पण या मिठाई खाणं कितपत सुरक्षित आहे? काय आहे नेमकं सत्य? जाणून घ्या.


सण येताच मधुमेही रुग्णांची गोड खाण्याची अडचण 


सण येताच मधुमेही रुग्णांची अडचण होते. ही समस्या इतर काही नसून गोड पदार्थांशी संबंधित आहे. या लोकांना मिठाई टाळावी लागते. मात्र, आता या लोकांसाठी शुगर फ्री मिठाईही बाजारात उपलब्ध आहे, पण कृत्रिम गोडवा वापरून बनवलेल्या या मिठाई आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत का? या मिठाईच्या सेवनाने रक्तातील साखरेवर काही परिणाम होतो का? हे नीट समजून घेऊया.


मधुमेहींसाठी साखरमुक्त मिठाई किती फायदेशीर आहे?


मधुमेहींनी साखरेची लालसा भागवण्यासाठी कृत्रिम गोड वापरण्यास सुरुवात केली आहे. या मिठाई शुगर-फ्री आहेत, त्यामुळे कॅलरीज कमी आहेत, परंतु ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवणार नाहीत असा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, असे मानले जाते की, या मिठाईची कॅलरी कमी असू शकते, जसे की एखाद्या सामान्य मिठाईमध्ये 500 कॅलरीज असतात, तर शुगर फ्रीमध्ये 200 कॅलरीज असतात. या प्रमाणात पाहिल्यास, साखर कमी असली तरी ती शरीरात पोहोचते.


कंपन्यांकडून फसवणूक?


एका रिपोर्टनुसार, शुगर फ्री मिठाईला एक लेबल असते, पण त्या लेबलची सत्यता कोणालाच माहीत नसते. त्याच वेळी, स्थानिक दुकानांमधून घेतलेल्या मिठाईच्या सत्यतेचा कोणताही पुरावा सापडत नाही. त्यामुळे त्यांना शुगर फ्री मानून खाणे मधुमेही रुग्णांसाठी घातक ठरू शकते. एस्पार्टम, सुक्रॅलोज आणि सॅकरिन सारख्या गोड पदार्थांचा त्यांच्या बनवण्यामध्ये समावेश आहे. स्टीव्हिया आणि मोंक फ्रूट सारख्या गोड पदार्थांनी बनवलेल्या मिठाई आणखी हानिकारक असतात. मात्र, स्वीटनरचा अतिरेकी वापर आरोग्यासाठी घातक असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते. याशिवाय लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, अनियंत्रित कोलेस्ट्रॉल, हृदयविकार आणि कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो.


मधुमेहाच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी पर्याय



  • हे लोक बेसनाचे लाडू खाऊ शकतात.

  • बिया आणि नटांपासून बनवलेली बर्फी खाणे देखील फायदेशीर ठरेल.

  • नारळापासून बनवलेले लाडू मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहेत.

  • सफरचंदाची खीर खाऊ शकता. 


 


हेही वाचा>>>


Fitness: अरेच्चा.. बटाटे आणि अंडी खाऊन चक्क 31 किलो वजन कमी केलं? फिटनेस प्रशिक्षक महिलेचा दावा, जाणून घ्या


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )