Health: देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यात दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे, हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे, यानिमित्त प्रत्येक घरात त्याची तयारी महिनाभर आधीच सुरू होते. हा सण दिव्यांचा उत्सव म्हणूनही ओळखला जातो. दिवाळीत पारंपारिक दिव्यांसोबत फॅन्सी दिवे लावण्याचा ट्रेंडही आहे. घर, दुकानं, रस्ते आणि अगदी ऑफिसमध्येही लाईटिंग लावलेली दिसेल. पण तुम्हाला माहीत आहे का? की काही लोकांच्या मानसिक आरोग्यावर या लाईटिंगचा खोल परिणाम होतो? सणासुदीच्या वेळी या लाईटिंगचा कसा परिणाम होतो? जाणून घेऊया. यासोबतच त्यांच्या प्रभावापासून स्वतःला वाचवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
दिवाळीच्या दिव्यांचा मेंदूवर होतो परिणाम?
टेन्शन
दिवाळीत या इलेक्ट्रीकल दिव्यांची चमक आणि रंगांचे प्रमाण वाढते, त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. काही लोकांना थेट डोळ्यांनी हे दिवे पाहण्यास त्रास होतो. त्यामुळे या लोकांमध्ये तणावाची भावना निर्माण होते. विशेषत: संवेदनशील लोकांना या दिव्यांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
झोपायला त्रास होतो
ही बहुतेक लोकांची समस्या आहे. काहींना दिवाळीत रंगीबेरंगी दिवे लावायला आवडतात, पण दिव्यांच्या तेज प्रकाशामुळे त्यांना रात्री झोपणे कठीण होते. हे नैसर्गिक आहे. कारण चांगल्या झोपेसाठी अंधार आवश्यक आहे. इतकंच नाही तर दिवाळीच्या दिव्यांनी निघणाऱ्या किरणांचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होतं. असं सांगण्यात येतं
ओव्हरलोड
या दिव्यांचा प्रभाव असा आहे की, ते काही लोकांना ओव्हरलोडची भावना देऊ लागतात. यामुळे काही लोकांना अनावश्यक कामांचे ओझे वाटू लागते, ज्यामुळे चिंता आणि तणावही वाढतो.
डोळ्यांवर परिणाम
रंगीत दिव्यांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे डोळ्यांवर ताण किंवा अस्वस्थता येऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखी आणि थकवा येऊ शकतो.
लक्ष विचलित करणे
या दिवाळीच्या दिव्यांची चमक अशी आहे की, यामुळे तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे हे नक्की. त्यांच्या प्रकाशामुळे काम करणं कठीण होते.
या टिप्ससह स्वतःचे रक्षण करा
- तुमच्या घरात सॉफ्ट लाइटिंग लावा.
- तुमच्या घराच्या सजावटीसाठी जास्त व्हायब्रंट रंग वापरू नका.
- तुमच्या विश्रांतीची जागा बदला आणि काही दिवस तुम्ही घरातील इतर खोल्या वापरा, जिथे शांतता असेल आणि जास्त प्रकाश नसेल.
- रात्री झोपण्यापूर्वी घरातील दिवे बंद करा.
- आजूबाजूच्या प्रकाशामुळे झोप येत नसेल, तर रात्री खिडक्या-दारे बंद करून ठेवा.
- याशिवाय स्वतःला हायड्रेट ठेवा, जास्त गोड खाऊ नका आणि फोन आणि लॅपटॉपचा वापर कमी करा.
हेही वाचा>>>
Fitness: अरेच्चा.. बटाटे आणि अंडी खाऊन चक्क 31 किलो वजन कमी केलं? फिटनेस प्रशिक्षक महिलेचा दावा, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )