Health : पावसाळा आला की वातावरणात गारवा पसरतो. निसर्ग बहरून येत असल्याने हा ऋतू अगदी आनंददायी वाटतो. पण पावसाळ्यात आल्हाददायक वातावरणासोबत विविध आजारही डोकं वर काढतात. पावसाळ्यात तुम्ही आजारी पडण्याची शक्यता अधिक पटीनी वाढते. त्यामुळे पावसाळा जितका आनंददायी असतो, तितकाच तो तुमच्यासाठी त्रासाचे कारणही बनू शकतो. या ऋतूमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढत फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा धोका का वाढतो? काय आहेत कारणं? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या..


 


पावसाळ्यात सामान्य व्यक्तीलाही आजार होऊ शकतात


जर तुम्ही असा विचार करत असाल की ज्यांना दमा आहे त्यांनाच हे आजार होऊ शकतात, तर असे अजिबात नाही, तुम्ही जरी सामान्य व्यक्ती असाल तरी तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांशी संबंधित समस्या असू शकतात. पावसाळ्यात फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा धोका का वाढतो? एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार नवी दिल्लीचे डॉ. अक्षय बुधराजा यांनी याबद्दल माहिती दिली आहे.


 


जिवाणू संसर्ग


बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका पावसाळ्यात झपाट्याने वाढतो. पावसाळ्यात जिवाणू संसर्गाचा धोका सामान्यतः त्या अवयवांना होतो, जे पाऊस किंवा त्याच्या पाण्याच्या थेट संपर्कात येतो. फुफ्फुसातील जिवाणू संसर्गामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.


 


ऍलर्जीक प्रतिक्रिया असणे


पावसाळ्यात ऍलर्जीचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. ऍलर्जीची बहुतेक लक्षणे केवळ आपल्या श्वसन प्रणालीमध्ये दिसतात. श्वसनसंस्थेतील लक्षणेही तुमच्या फुफ्फुसांना थेट नुकसान पोहोचवू शकतात. सोप्या शब्दात, पावसाळ्यात ऍलर्जीमुळे फुफ्फुसात काही समस्या उद्भवू शकतात.


 


फुफ्फुसातील बुरशी


दीर्घकाळ पाऊस फुफ्फुसासाठी हानिकारक मानला जातो. कारण सलग अनेक दिवस पाऊस किंवा पावसासारख्या वातावरणामुळे हवेत ओलावा असतो, त्यामुळे हा ओलावा श्वासाद्वारे फुफ्फुसात जाऊ लागतो. फुफ्फुसात प्रवेश केल्यानंतर, बुरशी हळूहळू तयार होते आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो.


 


व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारे आजार


जास्त वेळ पाऊस पडणे म्हणजे सूर्यप्रकाशापासून जीवनसत्त्वे मिळत नाहीत, तसेच आहारातून जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळत नसतील तर त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुमच्या फुफ्फुसांनाही थेट नुकसान होते.


 


पावसाळ्यात फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा धोका का वाढतो?



  • पावसाळ्यात हवेची गुणवत्ता खराब होते, आर्द्रता वाढल्याने प्रदूषणाचे कण हवेत दीर्घकाळ राहतात, ज्यामुळे आपल्या श्वसनसंस्थेला खूप नुकसान होते.

  • आर्द्रतेमुळे परागकणांचा साचा वाढतो, हे दोन्ही ऍलर्जीचे स्त्रोत आहेत

  • ज्यांना श्वासनलिकांसंबंधी अस्थमा, श्वसन ऍलर्जी किंवा नाकाची ऍलर्जी आहे, या समस्या पावसाळ्यात लक्षणीय वाढतात.

  • या वातावरणात जिवाणू आणि विषाणू सहज वाढतात, त्यामुळे विषाणूजन्य श्वसनाचे आजार, सर्दी आणि न्यूमोनियाची प्रकरणे वाढतात.

  • सततच्या पावसामुळे आजूबाजूच्या परिसरात बुरशीची पातळी वाढते

  • जर तुम्ही त्यात श्वास घेत असाल तर तुम्हाला ॲलर्जी किंवा दमा होऊ शकतो.


 


कसे टाळावे?


स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
दमट आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
प्रतिकारशक्ती मजबूत करा.
शरीराला हायड्रेट ठेवा.
धुम्रपान टाळा.
मास्क घाला.
वाफ घ्या.


 


 


हेही वाचा>>>


Child Health : पालकांनो सावधान! पावसाळ्यात लहान मुलं डेंग्यूचे सहज बळी होऊ शकतात, 'या' टिप्सच्या मदतीने घ्या विशेष काळजी 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )