Health: हसताय ना...हसायलाच पाहिजे... हा डायलॉग आपण सतत कॉमेडी शो च्या माध्यमातून टिव्हीवर ऐकत असतो. पण हे खरंच आहे. ते म्हणतात ना..हसण्याने आयुष्य वाढते.. पण आता डोळ्यांच्या विविध समस्या असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या लोकांना डोळ्यांतील समस्या दूर करण्यासाठी कोणत्याही आयड्रॉपची गरज भासणार नाही. होय, शास्त्रज्ञांनी कोरड्या डोळ्यांवर एक नैसर्गिक आणि मस्त उपाय शोधला आहे. एका संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरडे डोळे मोठ्याने हसल्याने बरे होऊ शकतात. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. याचा अर्थ कोरड्या डोळ्यांसाठी महागडे आयड्रॉप्सच्या ऐवजी हास्य थेरपी हे सर्वोत्तम औषध आहे.
हे संशोधन कुठे झाले?
लंडनमधील ब्रिटिश शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगातील सुमारे 36 कोटी लोक ड्राय आय सिंड्रोमने ग्रस्त आहेत, त्यामुळे हे संशोधन करावे लागले. एकट्या ब्रिटनमध्ये सातपैकी एका व्यक्तीला डोळ्यांच्या समस्येने ग्रासले आहे. या समस्यांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे आणि लाल होणे यांचा समावेश होतो.
लाफ्टर थेरपीने महागडे आय ड्रॉप्स बदला
संशोधकांच्या मते, जे लोक सतत आयड्रॉप्स वापरतात, त्यांच्यासाठी हसणे हा एक नवीन आराम आहे. यामुळे महागड्या उपचारांपासून परवडत नसलेल्या लोकांना दिलासा मिळेल. शास्त्रज्ञांनीही ही पद्धत एक उत्तम पर्याय मानली आहे.
अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला?
संशोधनासाठी वैज्ञानिकांनी दोन गट तयार केले होते, या गटांमध्ये चीन आणि ब्रिटनमधील लोकांचा समावेश होता. अभ्यासासाठी, एका गटाला फक्त हसायला लावणारे व्यायाम केले गेले. तर दुसऱ्या गटावर डोळ्यातील थेंब टाकून उपचार करण्यात आले. दिवसातून चार वेळा या लोकांच्या डोळ्यात आय ड्रॉप्स टाकण्यात आले. आणि थेरपीचे विषय दिवसातून चार वेळा पाच मिनिटे हसायला लावले. हा सराव सलग आठ आठवडे चालू ठेवला गेला आणि नंतर निकाल लागला, ज्यामध्ये हास्य थेरपी अधिक यशस्वी झाली.
डोळे कोरडे होण्याची कारणे
औषधांचा प्रभाव
कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर
एसीमध्ये बराच वेळ राहणे
सनग्लासेस न घालता उन्हात राहणे
कमी झोप
कसे टाळावे?
पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
फोन किंवा स्क्रीनचा वापर कमी करा.
आहारात व्हिटॅमिन ए, बी-12, ई, सी पदार्थांचा समावेश करा.
डोळे स्वच्छ ठेवा.
हेही वाचा>>>
Fitness: अरेच्चा.. बटाटे आणि अंडी खाऊन चक्क 31 किलो वजन कमी केलं? फिटनेस प्रशिक्षक महिलेचा दावा, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )