Health: मायग्रेन हा डोकेदुखीचा एक गंभीर प्रकार आहे, ज्याचा सामना करणे चिंताजनक असू शकते. यामुळे केवळ डोकेदुखीच नाही तर शरीराला थकवा देखील येतो आणि दैनंदिन कामं करणे कठीण होते. मायग्रेन दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यत्यय आणू शकते ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे आणि दैनंदिन कामे करणे कठीण होते. मळमळ, डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणे, मूड स्विंग्ज आणि चिडचिड, थकवा ही लक्षणे आहेत. न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशलिस्ट डॉ पवन पै यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या...


एक किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करू नका


मायग्रेनचा सामना करणे त्रासदायक ठरते, कारण ही समस्या काही तासांपासून ते अनेक आठवड्यांपर्यंत राहू शकते. मायग्रेनच्या समस्येत मेंदूतील काही रसायने बाहेर पडतात. मायग्रेनमुळे असह्य डोकेदुखी होऊ शकते आणि एखाद्याला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मायग्रेनला एक किरकोळ समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. योग्यरित्या याचे उपचार न केल्यास मायग्रेनचे झटके अधिक वारंवार येऊ शकतात. काही खाद्यपदार्थ खाणे, हार्मोनल बदल, हवामानात अचानक बदल होणे आणि अगदी तीव्र वास येणे अशा काही गोष्टी यास कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया डॉ पवन पै यांनी दिली आहे.


मायग्रेनचा सामना करणे आव्हानात्मक, लक्षणं काय आहेत?


मायग्रेनचा सामना करणे आव्हानात्मक असू शकते, विशेषत: जेव्हा त्यांना डोकेदुखीसह सौम्य ते तीव्र, मळमळ किंवा प्रकाशाची वाढलेली संवेदनशीलता यासह अनेक लक्षणे जाणवू लागतात. जेव्हा तुम्ही एखादे नवीन शहर किंवा नवीन ठिकाणी भेट देत असाव तेव्हा तापमानात अचानक बदल, अतिशय प्रकाश, थकवा आणि वातावरणातील बदलामुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते, जेव्हा प्रकाश जास्त असेल तेव्हा सनग्लासेस घालणे, भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती घेणे गरजेचे आहे.  योग्य झोपेची दिनचर्या पाळल्यास तुम्हाला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. काही ठराविक टिप्सचे पालन केल्यास तुम्ही तुमच्या सहलीचा पुरेपूर आनंद लुटण्यापासून लूट शकता असेही डॉ पै यांनी स्पष्ट केले.


...यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवते!


डॉ. नीरज सिंग, सल्लागार एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन पुढे सांगतात की, मायग्रेन हा आजार गंभीर असू शकतो, विशेषत: तुम्ही प्रवास करत असताना त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. अपरिचित ठिकाणी प्रवास करणे, फ्लाइट, कार किंवा ट्रेनमध्ये एकाच ठिकाणी तासनतास बसणे यामुळे तुमच्या दिनचर्येत अचानक बदल होऊ शकतात. हे मायग्रेनसाठी संभाव्य ट्रिगर म्हणुन ओळखले जातात जे प्रवास करताना मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे निर्जलीकरण होणे याचा देखील समावेश आहे. 7 ते 8 तासांची झोप न होणे , प्रवासादरम्यान पुरेसे पाणी न पिणे किंवा वेळच्या वेळी आहार न घेणे यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवते प्रवास करताना मायग्रेनचा त्रास होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमची नेहमीची औषधे सोबत बाळगणे हे या वेदनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.


हेही वाचा>>>


Cancer: अवघ्या 40-50 दिवसांत स्टेज 4 कॅन्सरवर मात? नवज्योत सिंह सिद्धूच्या पत्नीची कमाल, सांगितला संपूर्ण Diet, तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )