Health: अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्सचा वापर करतात, काही लोक असे म्हणतात की कानामध्ये कॉटन बड्सचा वापर केल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. पण असं करणं तुमच्या कानांसाठी असुरक्षित असल्याचं तज्ज्ञ सांगतात. जाणून घ्या..


कानांच्या पडद्यासाठी ते चांगले मानले जात नाहीत?


हवा, धूळ, माती आणि प्रदूषणामुळे कानात घाण साचते. कानात जमा होणाऱ्या या घाणीला इअर वॅक्स म्हणतात. ते स्वच्छ करण्यासाठी लोक कॉटन बड्स वापरतात. कॉटन बड्स कानातील घाण साफ करतात, परंतु कानांच्या पडद्यासाठी ते चांगले मानले जात नाहीत. विशेषतः पालकांनी मुलांचे कान स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्सचा वापर करू नये. पालकांना असे वाटते की कॉटन बड्स वापरल्याने कानात वेदना, खाज सुटणे आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर बाजारात अशा वस्तू खरेदी करताना अनेकदा लोक प्रश्न विचारतात की, कॉटन बड्सने कान स्वच्छ करणे योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर डॉ. सदानंद गोरे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिले आहे.






कॉटन बड्सने कान स्वच्छ करणे सुरक्षित आहे का?


डॉ.गोरे सांगतात की, कॉटन बड्सने कान स्वच्छ करणे अजिबात योग्य नाही. तज्ज्ञांच्या मते, कॉटन बड्स कानातील मळ आणि घाण साफ करतात, परंतु यामुळे कानात चट्टे येऊ शकतात. इतकेच नाही तर कॉटन बड्स कानाच्या पडद्यासाठीही चांगल्या नसतात. डॉक्टरांनी सांगितले की, जेव्हा आपण कानात कॉटन बड्स घालतो, तेव्हा ते आपल्यासाठी आघातासारखे असते.
जेव्हा आपण इअर बड्सने कान स्वच्छ करतो तेव्हा कामातील मळ आतमध्ये ढकलला जातो, त्यामुळे बाहेरचे कणही कानाच्या आत जातात. कानात प्रवेश करणाऱ्या परकीय कणांमुळे वेदना, श्रवण कमी होणे आणि कानात लहान मुरुम येऊ शकतात.


कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती?


बेबी आईल वापरा


कानातील घाण साफ करण्यासाठी तुम्ही बेबी ऑइल वापरू शकता. बेबी ऑइलचे 2 ते 3 थेंब कानात टाका. असे केल्याने घाण वरच्या दिशेने येईल आणि तुम्ही ती कोणत्याही सुती कापडाने सहज स्वच्छ करू शकता.


आंघोळ करताना कान स्वच्छ करा


तज्ज्ञांच्या मते, जे लोक दररोज आंघोळ करताना त्यांचे कान व्यवस्थित स्वच्छ करतात, त्यांना इअर बड्स किंवा इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते.


हेही वाचा>>>


Men Health: आश्चर्यच...'साडी कॅन्सरचा' केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही धोका? कसं शक्य आहे? डॉक्टर म्हणतात...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )