Health: सध्या देशासह जगभरात नवीन वर्षाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. न्यू इयरच्या पार्टीसाठी विविध हॉटेल्स, बार, आणि रिसॉर्ट सज्ज झाले आहेत. आपण नेहमी पाहतो. पार्टी म्हटली की दारूचे सेवन आधी केले जाते. आजकाल पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुसरण केलं जात असून मद्यपानाशिवाय कोणतीही पार्टी अपूर्णच मानली जाते. या पार्ट्यांमध्ये दारूचे सेवन अमर्यादपणे केले जाते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हरमुळे डोकेदुखी आणि आळस वाढतो. याबाबत प्रसिद्ध डॉक्टरांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. ते सांगतात, जर दारू पिण्याआधी एक गोष्ट खाल्ली, तर ते आपल्याला हँगओव्हर होण्यापासून प्रतिबंधित करते. याबद्दल जाणून घ्या...
दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक असले तरी..
दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, परंतु पार्ट्यांमध्ये विशेषतः न्यू इयर पार्ट्यांमध्ये दारूचे सेवन सर्रासपणे केले जाते. नवीन वर्षाच्या उत्सवात दारू पिणे सामान्य आहे, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हरमुळे डोकेदुखी, थकवा आणि मळमळ होणे देखील सामान्य आहे. अलीकडेच एका डॉक्टरांनी खुलासा केला आहे की, जर आपण दारू पिण्याआधी चीज खाल्ल्यास आपल्याला हँगओव्हर होत नाही. होय, याविषयी अधिक जाणून घेऊया.
डॉक्टर काय म्हणतात?
DailyMail.com वर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये तज्ज्ञ असलेल्या डॉ. नीना चंद्रशेखरन यांनी सोशल मीडियीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात त्या म्हणतात चीज खाल्ल्याने अल्कोहोल हँगओव्हर नियंत्रित केला जाऊ शकतो.
याचे कारण काय?
डॉ. नीना यांच्या मते, चीज हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यामध्ये प्रथिने, चरबी आणि निरोगी कर्बोदके जास्त प्रमाणात असतात, जे पोटाला आवरण देतात, ज्यामुळे अल्कोहोलचे शोषण कमी होते. त्यामुळे अल्कोहोल शरीरात गेल्यावर त्याचा चयापचय क्रियेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. चीज देखील पोषक तत्वांचा पुरवठा करते, त्यात व्हिटॅमिन बी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे दारू पिण्यापूर्वी चीज खाणे फायदेशीर ठरते. याशिवाय हे दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने मादक पदार्थांचा प्रभावही कमी होतो.
हँगओव्हर टाळण्यासाठी आणखी 5 टिप्स
अल्कोहोल सेवन करण्याआधी योग्य आहार घ्या,
चीजसोबत सुका मेवा आणि फळे खाणे आवश्यक आहे.
प्रत्येक ड्रिंकनंतर पाणी प्या
म्हणजेच 1 ग्लास अल्कोहोल प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने अल्कोहोलचा प्रभाव कमी होतो.
कोल्ड ड्रिंक आणि कॉकटेल पिणे टाळा.
पार्टीमध्ये मद्यपान करण्यासोबतच तुम्ही लिंबूपाणीचेही सेवन करू शकता.
अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी नारळ पाणी प्या.
हेही वाचा>>>
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )