Health: मूल जन्माला येणं हे निसर्गाचं एक अमूल्य वरदान आहे, मुलगा असू द्या, किंवा मुलगी.. आई-बाबा होणं जगातील कोणत्याही स्त्री-पुरुषासाठी मोठं सुख असतं. खरं तर गर्भाशयातील मुलाचे लिंग हे पालकांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असते. पण अलीकडच्या संशोधनात धक्कादायक गोष्टी आढळल्या आहेत. आजकाल तरुणांंमधील Y गुणसूत्रे हळूहळू कमी होत असल्याचे समोर आले आहे. हे असेच चालू राहिले तर भविष्यात फक्त मुलीच जन्माला येतील आणि पुरुषांचा जन्म शक्य होणार नसल्याचे सांगण्यात येतंय. नेमकं काय म्हटलंय या संशोधनात?
मानवामधील Y गुणसूत्रे हळूहळू कमी होतंय?
खरं तर स्त्रियांमध्ये दोन X गुणसूत्र असतात, तर पुरुषांमध्ये एक X आणि एक Y गुणसूत्र असते. जर गर्भामध्ये XX गुणसूत्र असतील तर ती मुलगी आहे आणि जर XY असेल तर तो मुलगा आहे. मुलाच्या जन्मासाठी Y गुणसूत्र आवश्यक आहे. पण अलीकडच्या संशोधनात Y गुणसूत्रे हळूहळू कमी होत असल्याचे समोर आले आहे. हे असेच चालू राहिले तर भविष्यात फक्त मुलीच जन्माला येतील आणि पुरुषांचा जन्म शक्य होणार नाही. Y गुणसूत्र नाहीसे व्हायला लाखो वर्षे लागतील, तरी संपूर्ण मानवजातीसाठी ही धोक्याची घंटा आहे. शास्त्रज्ञ यावर व्यापक संशोधन करत आहेत, जेणेकरून Y गुणसूत्र नष्ट होण्यापूर्वी त्यावर उपाय शोधता येईल.
Y गुणसूत्र: मानवी भविष्यासाठी धोका?
सायन्स अलर्टच्या अहवालानुसार पुरुषांचे Y गुणसूत्र हळूहळू नाहीसे होत आहे. Y क्रोमोसोम म्हणजेच गुणसूत्र हळूहळू नष्ट झाल्याने मानवी भविष्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ते संपण्यास लाखो वर्षे लागू शकतात. Y गुणसूत्र नाहीसे होण्यापूर्वी मानवाने नवीन जनुक विकसित केले नाही, तर पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते.
Y गुणसूत्र पुरुषांच्या विकासात कसे योगदान देते?
Y क्रोमोसोममध्ये एक विशेष जनुक असते, ज्यामुळे भ्रूण पुरुष म्हणून विकसित होतो. जेव्हा हे जनुक गर्भधारणेच्या 12 आठवड्यांनंतर सक्रिय होते, तेव्हा गर्भामध्ये पुरुष हार्मोन्स तयार होऊ लागतात. हे हार्मोन भ्रूण पुरुषात विकसित करतात. Y क्रोमोसोम नसल्यास, गर्भ मादी म्हणून विकसित होतो.
Y गुणसूत्रांच्या संख्येत घट
संशोधनात असे आढळून आले आहे की, Y गुणसूत्रांची संख्या हळूहळू कमी होत आहे. गेल्या 166 दशलक्ष वर्षांमध्ये, Y गुणसूत्र 900 जनुकांपासून फक्त 55 जनुकांवर संकुचित झाले आहे. या दराने, दर 1 दशलक्ष वर्षांनी Y गुणसूत्रातून सुमारे 5 गुणसुत्रे नष्ट होत आहेत. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, असेच चालू राहिल्यास पुढील 11 दशलक्ष वर्षांत Y गुणसूत्र पूर्णपणे नाहीसे होऊ शकते.
Y क्रोमोसोमशिवाय पुरुष जन्माला येणे शक्य आहे का?
या चिंतेदरम्यान शास्त्रज्ञांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. पूर्व युरोप आणि जपानमध्ये आढळणाऱ्या काही उंदरांच्या प्रजातींनी त्यांचे Y गुणसूत्र गमावले आहे, तरीही ते जिवंत आहेत. या उंदरांमध्ये, X गुणसूत्र दोन्ही भूमिका बजावत आहे. मात्र, या उंदरांमध्ये लिंग निर्धारण कसे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.परंतु मानवांमध्ये, पुनरुत्पादनासाठी शुक्राणूंची आवश्यकता असते, जी पुरुषाकडून येते. जर Y गुणसूत्र नाहीसे झाले तर ते मानवांसाठी एक मोठे संकट असू शकते, कारण याचा अर्थ असा होतो की पुरुष जन्माला येणार नाहीत.
एक मोठी चिंता
Y क्रोमोसोम हळूहळू कमी होत असल्याने शास्त्रज्ञ याला मोठी चिंता मानत आहेत. ती संपायला अजून लाखो वर्षे बाकी असली तरी त्यावर संशोधन चालू आहे. जर मानवाने पर्याय म्हणून कोणतेही नवीन जनुक विकसित केले नाही तर मानव जातीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
हेही वाचा>>>
Health: अजबच! टेन्शनमुळे मूल होण्याची शक्यता वाढते? संशोधनात धक्कादायक दावा; शास्त्रज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )