Health : आपण लहानपासून ऐकत आलोय, पहाटे लवकर उठावं, सकाळी जास्त वेळ अंथरुणावर पडून राहू नये. काहीजण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कारण यावेळेत काहींना अंथरुणातून निघावसं वाटत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. जे वाचल्यानंतर तुम्ही स्वत:हूनच पहाटे 4 वाजता अंथरुणातून उठाल, आणि तुमच्या शरीराला रोजची सवय होईल, प्रेमानंद जी महाराजांनी ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा निश्चित मार्ग सांगितला आहे. जो वाचल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आपण नेहमी पाहतो, मोठमोठे व्यापारी, सेलिब्रिटी पहाटे उठतात. आजकाल परदेशी लोकही हे काम करतात. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय, तर तुम्हीही लवकर उठण्याचा योग्य मार्ग अवलंबू शकता...
विज्ञानानेही केलं मान्य
आजकालच्या लोकांची जीवनशैली अशी झाली आहे की, सकाळी उठणे हे सर्वात कठीण काम झाले आहे. जुन्या लोकांप्रमाणे 4 वाजता उठणे किंवा ब्रह्म मुहूर्त वैगेरे काही लोक मानत नाही. असे बरेच लोक आहेत, ज्यांचे 4-5 अलार्म वाजल्यानंतरही डोळे उघडत नाहीत. सकाळी लवकर उठण्याबाबत आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते. विज्ञान असेही मानते की, सकाळी लवकर उठल्याने शरीराला असे अनेक फायदे मिळतात. यामुळे तुमचा मेंदू, मन आणि शरीर हे तिन्ही निरोगी असतात आणि एकत्र काम करतात. या तिघांच्या मदतीने तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकता. वृंदावनचे स्वामी प्रेमानंद जी महाराज यांनी या समस्येवर उपाय सांगितला आहे.
पहाटे 4 वाजता कसे उठायचे?
प्रेमानंद जी महाराज यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले की, पहाटे 4 ते 6 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. हा काळ भजनासाठी लाभदायक आहे. या वेळी जो झोपतो त्याला भविष्यात मानसिक आजार आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रेमानंद जी महाराज म्हणाले की, पहाटे 4 वाजता उठण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिली इच्छाशक्ती आणि दुसरी म्हणजे नियम. या गोष्टींच्या मदतीने तुम्ही कोणतेही काम पूर्ण करू शकता. झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा की, काहीही झाले तरी तुम्ही यावेळी अंथरुण सोडाल.
तुमचं शरीर स्वतःच अंथरुण सोडण्यास सुरवात करेल
प्रेमानंद जी महाराज म्हणतात, तुम्ही रोज पहाटे 4 वाजता उठा, काही दिवसातच तुमच्या शरीराला या नियमाची सवय होईल. एकदा सवय झाली की, उठण्यासाठी शरीराला अलार्मचीही गरज भासणार नाही.
रात्री लवकर कसे झोपायचे?
सकाळी लवकर उठण्यासाठी रात्रीच्या झोपेकडेही लक्ष दिले पाहिजे. कमी झोप घेतल्यानेही शरीरावर ताण पडतो. त्यामुळे झोपेची वेळ थोडी लवकर ठेवा म्हणजे झोपेची कमतरता भासू नये. अशा प्रकारे तुम्हाला काही दिवसातच फायदे दिसू लागतील. शास्त्रानुसार लवकर झोपण्यासाठी तुम्हीही नियम पाळले पाहिजेत. दररोज रात्री एकाच वेळी झोपावे. झोपण्याच्या 2 तास आधी मोबाईल, लॅपटॉप वापरणे बंद करा, शक्य असल्यास पुस्तक वाचा. खोलीत अंधार करा आणि तापमान किंचित थंड असावे.
लवकर उठण्याचे फायदे
- अधिक ताजेपणा
- लक्ष केंद्रित होणे
- वेळेवर पोहोचणे
- मेंदूची शक्ती वाढणे
- योगा आणि ध्यानासाठी वेळ मिळतो
- उत्तम पचनशक्ती
- त्वचा चमकणे
- मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा
हेही वाचा:
Health : मोठ्या सुट्टीनंतर येतो कामाचा कंटाळा? काही करण्याची इच्छा होत नाही? 'अशा' प्रकारे दूर करा आळस
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )