Health: तुमचं आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात पूर्वीप्रमाणे गोडवा राहिला नाही? तुमच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे? जोडीदार पूर्वीप्रमाणे वेळ देत नाही? यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे तुमचं नात बिघडत चाललंय? तर आज आम्ही तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत. जे वाचल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहित आहे का? जोडीदाराने रोज घेतलेले चुंबन तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच दुरावा आणणार नाही? असं दररोज केल्याने जोडप्यांच्या आयुष्यात रोमांस आणि साहस भरू शकते? हे आम्ही म्हणत नसून एका अभ्यासातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. जाणून घ्या..


30 हजार लोकांवरील अभ्यास काय सांगतो?


इटलीमध्ये 3 वर्षे तब्बल 30 हजार जोडप्यांवर करण्यात आलेल्या या अभ्यासात असे दिसून आले की, दररोज 6 सेकंदाच्या चुंबनाने जोडप्यांमधील तणाव कमी होतो. यामुळे काही लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील तणाव कमी झाला, तर काही लोकांनी सांगितले की, ते आता त्यांचे व्यावसायिक जीवन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून वेगळे पाहू शकतात आणि ऑफिसचा ताण तिथेच सोडू शकतात. या अभ्यासात, 6 सेकंद चुंबन घेतल्याने तणाव कमी होणे, शांतता आणि आनंदीपणा यांसारखे बदल दिसून येतात. यानंतर, जोडपे एकमेकांशी अधिक भावनिकपणे जोडू शकतात, असं म्हटलंय.


6 सेकंदाच्या थेरपीमुळे जोडप्यांमध्ये झाला 'हा' बदल 


एका अहवालानुसार, या अभ्यासात सहभागी असलेले डॉ. जॉन गॉटमन म्हणाले की, किसींग थेरपीनंतर त्यांच्याकडे आलेल्या जोडप्यांनी दावा केला की, त्यांचे नाते पूर्वीपेक्षा आणखी सुधारले आहे. जॉनने पत्नी ज्युलियासोबत हा अभ्यास केला आहे. दोघेही प्रशिक्षित जोडपे थेरपिस्ट आहेत. जॉनने सांगितले की, अनेक जोडपे त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की, लग्नाच्या 10 वर्षानंतर त्यांचे नाते आता पूर्वीसारखे गोड राहिले नाही. गॉटमन म्हणाला की, त्यांनी जोडीदारावर दररोज 6 सेकंदाच्या चुंबनाची थेरपी करून पाहिल्यानंतर ते पूर्वीपेक्षा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ आले.


शास्त्रज्ञांनी केले 'हे' दावे


एका अहवालानुसार, 6 सेकंदांच्या चुंबनाशिवाय काही जोडप्यांवर 20 सेकंदांच्या मिठी मारण्याची थेरपीही करण्यात आली. दोघांमधील बिघडलेले नाते सुधारणे हा दोघांचाही उद्देश होता. डॉक्टरांच्या मते, या दोन्ही थेरपीमुळे मानवी शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन वाढते. ज्यामुळे लोकांमध्ये विश्वास वाढतो, डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, 6 सेकंद चुंबन घेतल्याने तणाव कमी होणे, शांतता आणि आनंदीपणा यांसारखे बदल दिसून येतात. यानंतर, जोडपे एकमेकांशी अधिक भावनिकरित्या कनेक्ट होऊ शकतात. 


 


हेही वाचा>>>


Health: अजबच! टेन्शनमुळे मूल होण्याची शक्यता वाढते? संशोधनात धक्कादायक दावा; शास्त्रज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )