Heat Wave : सध्या देशासह राज्यात विविध ठिकाणी उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. देशातील काही भागात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. अशात अनेक लोकं घरातून बाहेर पडणं टाळतायत. तर काही जणांना कामानिमित्त बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही,अशात कर्मचाऱ्यांनी वाढती उष्णता आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी खास सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. जाणून घ्या त्यात काय म्हटलंय..


 


वाढत्या गरमीमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण हैराण


सध्या सतत वाढत असलेल्या तापमानामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण हैराण झाले आहेत. अशा वातावरणात बाहेर काम करणाऱ्या लोकांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. हे लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय अवलंबण्यास सांगितले आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये.


 


लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय


तापमानात सातत्यानं वाढ होताना दिसतंय, अशात लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हामुळे लोकांना दिवसाच नाही तर रात्रीही आराम मिळत नाही. आरोग्य मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी देखील अति उष्णता आणि उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. 


 


 






 


 


सोशल मीडियावर पोस्ट शेअर 


आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समान सुविधा देण्यास सांगितले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना दिवसाच्या कडक उन्हात बाहेर ड्युटी करणे टाळण्यास सांगितले आहे. जेव्हा हवामान थंड असेल तेव्हाच बाहेरील कामं शेड्यूल करा, कर्मचाऱ्यांना देखील विश्रांती द्या. असं म्हटलंय


 


 


उष्णतेबाबत आरोग्य मंत्रालयाची सूचना


आरोग्य मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना उष्णतेशी संबंधित आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा सल्लाही दिला आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, निर्जलीकरण आणि श्वासोच्छवासाच्या समस्या ही उष्णतेशी संबंधित आजाराची सामान्य लक्षणे आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 


 


उष्माघाताची लक्षणे


वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही उष्माघाताची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय उष्माघातामुळे जुलाब, टायफॉइड, स्किन इन्फेक्शन अशा समस्याही होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात या धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.


 


या लोकांना उष्माघाताचा धोका जास्त


काही लोकांना उष्माघाताचा धोका जास्त असतो. जे लोक खूप मद्यपान करतात, पुरेसे पाणी पीत नाहीत. हृदय आणि मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त असलेले लोक देखील सहज उष्माघाताला बळी पडतात.


 


हेही वाचा>>>


Health : भर उन्हातून घरी आल्यावर तुम्हीही फ्रीजमधील थंड पाणी पिता? तर सावधान! आरोग्याला होणारे नुकसान जाणून घ्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )