Beauty Parlor Stroke Syndrome : पार्लरमध्ये जाऊन हेयर ट्रिटमेंट घेणं, हेअर वॉश करणं हे फार कॉमन आहे. पण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हेअर वॉश घेणाऱ्या प्रत्येकालाच स्ट्रोक सिंड्रोमबद्दल (Stroke Syndrome) माहित आहे का? अलीकडेच एका 50 वर्षांच्या महिलेने आपल्या स्ट्रोकवर निदान झाल्याचं सांगितल्यानंतर स्ट्रोक सिंड्रोम प्रकाशात आला आहे. मात्र, ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेणं गरजेचं आहे. 


ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हणजे नेमकं काय?


जेव्हा आपण आपलं डोकं विशेषत: केस धुण्यासाठी पार्लरमध्ये वाकवत असतो तेव्हा ते 20 अंशापेक्षा अधिक वाकत नाही. काही प्रकरणांमध्ये जेव्हा असं होते तो आपल्या मुख्यतः कशेरुकी बॅसिलर धमनीचा भाग असतो. ही प्रमुख धमनी असून जी या कशेरुकी भागातून जात असते आणि आपल्या मेंदूला आणि सेरेबेलमला रक्तपुरवठा करत असते. आता काही वेळा यापैकी एक धमनी खूप पातळ असू शकते आणि इतर धमन्या जास्त वाकलेल्या, वाढलेल्या किंवा कमकुवत झालेल्या असतात. जेव्हा त्यावर दबाव येतो तेव्हा स्ट्रोक होऊ शकतो. 
त्यामुळे आपल्या धमन्या मोकळ्या आणि मजबूत ठेवण्यासाठो अगदी घरच्या घरी मसाज किंवा तुम्ही पार्लरमध्ये असताना देखील मसाज घेणे फायद्याचे ठरते. मान वाकवताना काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. काही लोकांना धमन्यांच्या, हाडांचा मोठा आवाज ऐकण्यासाठी मानेला धक्का देण्याची सवय असते ज्यामुळे कधीकधी या धमनी भागातून स्ट्रोक देखील होऊ शकतो आणि ते खूप धोकादायक आहे. 


पार्लरमध्ये असे ट्रिगर्स कॉमन असतात कारण मानेच्या अँगुलेशनवर केस धुताना जास्त दाब दिला जात असतो. यामध्ये चक्कर येणं ही लक्षणे ही मुख्यतः असतात. रुग्णाला आपण बेशुद्ध होत आहोत असे सुद्धा वाटू शकते. आणि काही प्रकरणांमध्ये थोडा भाग सुन्न होत असल्याचे देखील जाणवू शकते. जर रुग्णाला हलकं डोकं, चक्कर येणं किंवा अचानक मळमळ अशी लक्षणे दिसून येत असतील, तर रुग्णाच्या बीपीचे निरीक्षण करणे आणि सुरक्षित आणि स्वच्छ असलेल्या भागात सर्व आवश्यक गोष्टींचे पालन करत प्रथमोपचार आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे.


या स्ट्रोकवर इलाज काय?


स्ट्रोक असलेल्या लोकांना रक्त पातळ करणारी औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो जे रक्ताच्या गुठळ्या रोखण्यासाठी आणि उपचार करण्यास मदत करतात. काही लोक स्ट्रोकनंतर बरे होतात. 


या स्ट्रोकपासून स्वत:चा बचाव कसा करायचा?


लक्षात ठेवा की, केस धुताना किंवा उपचार करताना, डोकं जोरदारपणे फिरवू नका. केस धुताना चक्कर येत असेल तर लगेच झोपा. अशा परिस्थितीत वेळ न घालवता आधी डॉक्टरांना सल्ला घ्या. 


पाहा व्हिडीओ : 



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : संधिवात म्हणजे काय? संधिवात टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला