Weight Loss Tips : आजकाल बहुतेक लठ्ठपणा (Obesity) किंवा वाढलेल्या वजनामुळे (Weightloss) त्रस्त आहेत. व्यस्त जीवनशैली (Busy Lifestyle), आहाराकडे (Diet) होत असलेलं दुर्लक्ष यामुळे वाढत्या वजनाची समस्या जास्त दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी काही लोक व्यायाम करतात, तर काही जण डायटिंग करण्याला प्राधान्य देतात. काही जण ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पितात. आता बहुतेकांना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी (Green Tea) आणि ब्लॅक टी (Black Tea) दोन्हीपैकी काय अधिक फायदेशीर आहे, याबाबात सविस्तर माहिती वाचा.
वजन कमी करण्यासाठी काय अधिक प्रभावी?
तज्ज्ञांच्या मते, ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. पण, वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी आणि ब्लॅक टी यापैकी काय अधिक फायदेशीर आहे, यावर तज्ज्ञांचं मत जाणून घ्या.
वजन कमी होण्यासाठी काय करावं?
वजन कमी होणे किंवा वाढणे हे तुमच्या चयापचयावर अवलंबून असते. वास्तविक, चयापचय ही एक प्रक्रिया आहे जी आपल्या शरीरातील अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करते. यामुळे संपूर्ण शरीरात ऊर्जा संचारते. अशा परिस्थितीत, जर आपला आहार आणि दैनंदिन दिनचर्या विस्कळीत झाली तर चयापचय मंदावतो, ज्यामुळे वजन वेगाने वाढते.
ब्लॅक टी
ब्लॅक टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स सारख्या अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात, हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पण ग्रीन टीच्या तुलनेत काळ्या चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फॅट बर्निंग कंपाऊंड्स नसतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या दृष्टीने ब्लॅक टीपेक्षा ग्रीन टी अधिक फायदेशीर आहे.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट ईजीसीजी असते, जे चरबी जाळण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे वनस्पती संयुगे असते, ज्यामुळे चयापचय क्रिया वाढवून वजन कमी करण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, याची मदत फॅट बर्न होण्यासाठी होते. ग्रीन टी प्यायल्याने पोट भरलेले वाटते, त्यामुळे जास्त खाणे टाळते.
ग्रीन टी की ब्लॅक टी काय उत्तम?
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे वनस्पती संयुगे असतात, ज्यामुळे चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत होते. त्यासोबतच, ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट देखील असतात, जे चरबी जाळण्यास मदत करतात. तर, ब्लॅक टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल सारखे अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. असं असलं तरीही ग्रीन टीच्या तुलनेत ब्लॅक टीमध्ये फॅट बर्निंग कंपाऊंडची कमतरता असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी अधिक प्रभावी मानली जाते. याशिवाय, काळ्या चहाच्या तुलनेत ग्रीन टीची प्रक्रिया कमी आहे, त्यामुळे ग्रीन टी अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध होतं.