Eye Care Tips : अनेकदा आपण पाहिलं असेल की अनेकांच्या डोळ्यांखाली (Eye Care Tips) डार्क सर्कल्स असतात किंवा काही लोकांच्या डोळ्यांना सूज आलेली दिसते. डोळ्यांखाली असणाऱ्या काळ्या डाग आणि सूज येण्याच्या मागे फक्त अपुरी झोप हेच एक कारण असू शकत नाही. तर, यामागे शरीरातील न्यूट्रिशनची (Nutrition) कमतरता तसेच सलग मोबाईल आणि लॅपटॉपचा वाढता वापर हे देखील मुख्य कारण आहे. ज्यामुळे तुमचे डोळे थकलेले दिसू लागतात तसेच डोळ्यांतून पाणीदेखील येऊ लागतं. अशातच जर कुठे बाहेर जायचं असेल तर अशा वेळी खरी पंचाईत होते. अशा वेळी या समस्येपासून सुटका कशी मिळवायची हे अनेकदा आपल्याला कळत नाही. या ठिकाणी असेच काही उपाय आहेत जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1. बटाटा
डोळ्यांच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बटाटा फार गुणकारी आहे. बटाट्यात एस्ट्रिजेंट तत्व असतात. जे डोळ्यांचा थकवा दूर करण्यास तसेच आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच, बटाट्यात हलक्या प्रमाणात ब्लीचिंग प्रॉपर्टीसुद्धा असते जी डार्क सर्कल्सच्या समस्येला दूर करण्यास मदत करते.
2. ग्रीट टी बॅग
ग्रीन टी बॅगसुद्धा काळ्या डागांबरोबरच तुमची समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरू शकते. यासाठी ग्रीन टी बॅगला हलक्या पाण्यात बुडवून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांपर्यंत डोळ्यांखाली ठेवा. याच्या थंडाव्याने तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.
3. थंड दूध
थंड दूध अनेक समस्यांवर गुणकारी आहे. तुम्हाला जर डोळ्यांच्या समस्येवर आराम मिळवायचा असेल तर तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता. दुधात लॅक्टिका एसिड आणि हायड्रोक्सी असे दोन गुणधर्म असतात जे डोळ्यांच्या खाली येणाऱ्या डार्क सर्कल्स आणि सुरकुत्यांपासून आराम मिळवून देण्यास उपयुक्त ठरू शकतात. यासाठी कॉटनच्या कपड्याने 10 ते 15 मिनिटं डोळ्यांखाली ठेवा. तुम्हाला आराम दिसेल.
4. गुलाब पाणी
गुलाब पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फ्लॅवोनॉईड्सचा समावेश असतो. हे पोषक तत्व डोळ्यांसाठी फार उपयुक्त आहेत. त्याचबरोबर डोळ्यांना जर खाज येत असेल, जळजळ होत असेल तर त्यावर तुम्हाला आराम मिळू शकतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली सुती कापडाने गुलाब पाण्यामध्ये बुडवून डोळ्यांवर काही वेळासाठी लावा. तुम्ही हवंतर रात्रभर देखील हा उपाय करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.