Skin Care Tips To Remove Scars : त्वचेवरील पिंपल्स गेल्यावर त्याचे निशाण राहतात. यामुळे हळूहळू चेहऱ्यावर डाग तयार होतात. यामुळे तुमची सुंदरता कमी होते. अशावेळी त्वचेची योग्य काळजी घेण्याची गरज असते. डाग दूर करण्यासाठी वेळीच योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. यावर योग्य उपाय केल्याने तुमच्या त्वचेवरील डाग दूर (Scar Removing Tips) होऊन त्वचा सुंदर, नितळ आणि तजेलदार होईल. तुमच्या त्वचेवरील डाग दूर करण्यासाठीचे उपाय काय आहेत जाणून घ्या.


तुमच्या त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी केवळ बाजारात मिळणाऱ्या क्रिम नाही तर घरगुती उपायही रामबाण ठरतात. तुम्ही तुमची जीवनशैली योग्यप्रकारे ठेवली तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही दिसू लागतो.  तुमच्या खाण्या-पिण्याच्या तसेच झोपण्याच्या सवयीचा तुमच्या आरोग्यावर आणि चेहऱ्यावरही परिणाम होत असतो. यामुळे तणाव, अपुरी झोप, पोषक आहाराची कमतरता, अपुरा सुर्यप्रकाश यामुळेही तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसू लागतो.
 
त्वचेवरील डाग दूर करण्याचे उपाय



  • काकडी किसून घ्या आणि यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घाला आणि हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे त्वचेवर लावा आणि नंतर ताज्या पाण्याने धुवा. त्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावा.

  • एका वाटीत अर्धा चमचा मध घ्या आणि त्यात दोन ते तीन थेंब लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे त्वचेवर लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

  • बेंझॉयल पेरोक्साइड किंवा व्हिटॅमिन-ए असलेले फेस क्रीम आणि लोशन वापरा. यावेळी तुमच्या त्वचेवरील डाग दूर होतील.

  • एका वाटीमध्ये हळद, बेसन, मुलतानी माती, चंदन पावडर समप्रमाणात घेऊन यामध्ये गुलाबपाणी मिक्स करून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक 20 ते 25 मिनिटे लावा आणि त्यानंतर चेहरा धुवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :