Ginger Side Effects : भारताप्रमाणेच जगभरात चहा (Tea) प्रेमी आहेत आणि त्यातच आल्याचा चहा (Ginger Tea) असेल तर मग आणखी कशाची गरज नाही. आलं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात आल्याचे सेवन करण्याने शरीराला फायदा मिळतो. आलं झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पण, आल्याच्या सेवनाचे जितके फायदे आहे तितके तोटे देखील आहेत. आल्याच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. आल्याचे अतिसेवन केल्यास हृदयसंबंधित समस्या, रक्तातील साखर कमी होणे यासारखे आजार उद्भवू शकतात. इतकेच नाही तर गरोदर महिलांसाठी आल्याचं जास्त सेवन केल्यास गर्भपात होण्याचाही धोका असतो. त्यामुळे आल्याचे सेवन योग्य प्रमाणात करणे, आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल, नाहीतर तुम्हाला त्रास सहन करावा लागेल.


आलं खाण्याचे फायदेच नाही तोटेही!


तज्ज्ञांच्या मते, आलं सर्वांसाठी सुरक्षित आहे आणि त्याचे दुष्परिणाम नगण्य आहेत. पण, जर आलं दररोज जास्त प्रमाणात खाल्लं तर, त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. आल्याच्या अतिसेवनाचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. या दुष्परिणामांमध्ये छातीत जळजळ, जुलाब, ढेकर येणे आणि पोटाच्या समस्या यांचा समावेश असू शकतो. दररोज पाच ग्रॅमपेक्षा जास्त सेवन केल्या आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.


आल्याचे अतिसेवन गर्भवती महिलांसाठी हानिकारक


आलं जास्त प्रमाणात खाणं  गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरु शकते. गरोदर स्त्रिया आल्याचे सेवन करू शकतात, पण काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, गरोदरपणात आल्याचं अतिसेवन करणे बाळ आणि आई दोघांसाठीही हानिकारक ठरू शकते. आल्याच्या अतिसेवनामुळे जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो आणि काही परिस्थितींमध्ये गर्भपात देखील होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आल्याचं सेवन केले पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. 


तज्ज्ञांच्या मते, आल्यामध्ये असलेली संयुगे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात, पण बरेच लोक रक्तातील साखर कमी करण्यासाठी त्याचे जास्त प्रमाणात सेवन करतात. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे चक्कर येणे, थकवा येणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे आल्याचं सेवन करा, पण मर्यादित प्रमाणात करणं उत्तम ठरेल. यामुळे आल्याच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवू शकाल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Vitamin Deficiency : वारंवार थकवा येतोय? व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असू शकतं कारण; आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा