मुंबई : सध्या सोशल मीडियावर आणि विशेष करुन व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सुकलेला भाजीपाला अवघ्या दोन मिनिटांमध्ये ताजातवाना करतानाची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. यासाठी सुकलेला भाजीपाला एका फेसाळयुक्त भांड्यात बुडवला जात असल्याचेही या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओसोबत भाजीपाला घेताना शेतकऱ्यांकडूनच घ्या. व्यापारी तुम्हाला अशा प्रकारे फसवत आहेत. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते, अशी सूचनाही देण्यात आली आहे. काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.


दोन मिनिटात भाजीपाला फ्रेश कसा होतो?
बाजारात मिळणारा फ्रेश भाजीपाला पाहून लगेच हुरळून जाऊ नका. कारण, डोळ्यांना दिसणाऱ्या ताज्या भाजीपाल्यांमागे भयंकर गोष्टी दडलेल्या असू शकतात. जाधवपूर विद्यापीठात झालेल्या संशोधनातून हे काळं सत्य समोर आलं आहे. जाधवपूर विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक उत्पल रायचौधरी म्हणतात: 'कच्ची फळं आणि भाज्यांचा वापर आता धोकादायक होत आहे.


भाज्या ताज्या दिसण्यासाठी रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने यामधील पौष्टिक घटक नष्ट होत आहे. भाजीपाला आणि फळांचा रंग आणि ताजेपणा वाढविण्यासाठी कॉपर सल्फेट, र्‍होडॅमिन ऑक्साईड, मालाकाइट ग्रीन आणि प्राणघातक कार्बाईड ही रसायने सामान्यत: वापरली जातात. हे न्यूरोटॉक्सिक (मेंदूवर परिणाम करणारे) आहेत. ज्यामुळे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश असे आजार होण्याची शक्यत आहे. अशा रसायनांमुळे कन्सरचाही धोका होण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. यासोबत वृद्धत्वाच्या प्रक्रियाही यामुळे वेगवान होते, 'असे रायचौधुरी यांनी सांगितले. 


 व्हिडीओची सत्यता काय?
आम्ही या व्हिडीओची सत्यता तपासली असता हा व्हिडीओ सत्य असून यामध्ये कोणतीही एडिटींग किंवा छेडछाड केलेली आढळली नाही. मात्र, या व्हिडीओमधील भांड्यात कोणतं रसायन वापरलं आहे? आणि त्यामुळे आरोग्याला किती धोका आहे? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याचीही अधिकृत माहिती आमच्याकडे अद्याप उपलब्ध झालेली नाही. 


भाजीपाला अथवा फळे घेताना काय काळजी घ्याल?



  • प्रत्येक भाजी किंवा फळाला स्वतःचा एक गंध असतो. त्यामुळे भाजीपाला घेताना त्याचा गंध घेऊन पाहा. अनेकदा काही रसायनांमुळे भाजीपाल्याचा गंध जातो. किंवा कधी कधी रसायनांचा वेगळा गंध येतो. असा भाजीपाला घेऊ नका.

  • अनेकदा फळं चमकदार आणि फ्रेश दिसण्यासाठी त्याला पॉलिश केली जाते. त्यामुळे फळ घेताना ती चोळून पाहा. तुमच्या हाताला पॉलिश किंवा पावडर सारखा पदार्थ लागला तर अशी फळं घेऊ नका.