Fitness: आपण जेव्हा जेव्हा एखाद्या बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्रीला रुपेरी पडद्यावर पाहतो, तेव्हा अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो. हे लोक या वयातही आपलं वजन नियंत्रित कसं ठेवतात? अनेक बॉलवूड सेलिब्रिटी ज्यांनी वयाची 45 वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक आहेत. ते अजूनही इतके सुंदर कसे दिसतात? काय आहे त्यांच्या सौंदर्य आणि फिटनेसचं रहस्य, असे अनेक प्रश्न आपसूकच लोकांच्या मनात येतात. आता तुम्ही शिल्पा शेट्टीचं पाहा ना.. तिने फिटनेसच्या माध्यमातून आपल्या वयालाही मागे टाकले आहे. वयाच्या 49 व्या वर्षीही ती अगदी स्लिम-ट्रिम दिसते. शिल्पा शेट्टीच्या फिटनेसचं रहस्य जाणून घ्यायचं असेल, तर आज आम्ही तुम्हाला तिच्या 'ब्राऊन थिअरी' बद्दल सांगणार आहोत.
काय आहे शिल्पा शेट्टीच्या फिटनेसचे रहस्य?
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत लोकांना अनेक आजारांनी ग्रासलंय. अशात हेल्दी आणि स्लिम-फिट राहण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. सामान्यत: लोक बॉलिवूड कलाकार आणि मॉडेल्सचा डाएट फॉलो करतात, जेणेकरून ते त्यांच्यासारखे दिसावेत. शिल्पा शेट्टीचे फिटनेस रहस्य काय आहे ते जाणून घ्या.. शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेस आणि स्लिम बॉडीमुळे चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. शिल्पा शेट्टी खूप फिटनेस फ्रीक आहे, तिच्या आहारासोबतच ती योगा आणि व्यायामालाही महत्त्व देते. अभिनेत्री बऱ्याच काळापासून हेल्दी डाएट फॉलो करत आहे, ज्याबद्दल ती अनेकदा बोलली आहे. तुम्हालाही शिल्पा शेट्टीसारखी तंदुरुस्त आणि टोन्ड बॉडी हवी असेल तर तिचा डायट प्लॅन येथे जाणून घ्या.
शिल्पा शेट्टी काय खाते?
हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नाश्ता अगदी साधा आणि सामान्य आहे. ती सांगते की तिच्या दिवसाची सुरुवात कोरफडीच्या रसाने होते. हा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्वचा देखील स्वच्छ होते. यानंतर ती नाश्त्यात चहा आणि दलिया खाते. पांढऱ्या साखरेऐवजी ती ब्राऊन शुगर वापरते.
शिल्पा शेट्टीची 'ब्राऊन थिअरी' काय आहे?
अभिनेत्री म्हणते की, तिच्या डाएट प्लॅनचा सिद्धांत आहे की, तिने पांढऱ्या गोष्टींना तपकिरी गोष्टींनी बदलले आहे. उदाहरणार्थ, पांढऱ्या साखरेऐवजी ब्राऊन शुगर, पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस, पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खाणे योग्य मानते.
अन्न साधे असले तर उत्तम!
शिल्पा शेट्टी म्हणते की, फिट राहण्यासाठी ती अगदी साधे अन्न खाते आणि उकडलेले अन्न खात नाही. होय, पण ते अन्न ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवले जाते. तसेच, त्यांचे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देखील साधे असते, ज्यामध्ये प्रथिने, फायबर आणि पोषण भरपूर असते. ती दुपारच्या जेवणात डाळ-भात, रोटी आणि चिकन किंवा काही भाजी खाते. जर तिला संध्याकाळी भूक लागली तर ती अंडी आणि टोस्टसह एक कप चहा घेते आणि रात्रीच्या जेवणाप्रमाणेच खाते, अन्यथा ती रात्री फक्त 1 वाटी सूप पिते. याशिवाय अभिनेत्री रोज योगा आणि वेट ट्रेनिंगही करते.
हेही वाचा>>>
Winter Body Detox: शरीर आतून होईल स्वच्छ, भयंकर आजार जातील पळून! स्वामी रामदेवांचा रामबाण Body Detox फॉर्म्युला..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )