Eye Care, Glaucoma and Its Prevention : डोळ्यांचं (Eye) आरोग्य राखणे ही आवश्यक आहे. डोळ्यासंबंधित कोणतीही समस्या जाणवल्यासे वेळीच डॉक्टरांचा सल्ला (Eye Care Tips) घ्या, नाहीतर तुम्हाला दृष्टीही गमवावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आजाबाबत माहिती देणार आहोत. ज्यामध्ये लक्षणे समजत नाहीत आणि यामुळे कायमच अंधत्वही येऊ शकतं. ग्लूकोमा (Glaucoma) हा डोळ्यांचा आजार असून याला काचबिंदू (Kala Motia) असंही म्हटलं जातं. डोळ्यांच्या ऑप्टिकल नर्व्हला नुकसान होते, ज्यामुळे कायमस्वरुपी दृष्टी जाण्याचीही शक्यता असते.


डोळ्याचा 'सायलेंट किलर' ग्लूकोमा


ग्लूकोमा किंवा काचबिंदू या डोळ्याच्या आजारात ऑप्टिकल नसेला नुकसान होते. डोळ्याच्या मागच्या ऑप्टिकल मज्जातंतू असतात, जे डोळ्यातून मेंदूला व्हिज्युअल सिग्नल देतात, ज्यामुळे आपल्याला आजूबाजूचं चित्र व्हिज्युअलाइज करायला मदत होते आणि आपण स्पष्टपणे पाहू शकतो. ऑप्टिकल नर्व्हला नुकसान झाल्याने कायमचं अंधत्व येऊ शकतं. काचबिंदूचा ऑप्टिकल मज्जातंतूवर परिणाम होतो, तर मोतीबिंदू लेन्सवर परिणाम करतो.


'या' रोगाची लक्षणे नाहीत


या रोगाची कोणतीही ठराविक लक्षणे दिसत नाहीत. ऑप्टिक नर्व्ह ही तारासारखी असते जी डोळा मेंदूला जोडते. जेव्हा आपले डोळे कोणतेही चित्र किंवा दृष्य पाहतात, तेव्हा ही चित्रे रक्तवाहिनीद्वारे कॅमेरासारखे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात आणि तेव्हाच आपण पाहू शकतो. आपले डोळे वेळोवेळी तपासत राहणं, हे महत्वाचं आहे. 


मुलांनाही होऊ शकतो 'हा' आजार


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काचबिंदूला मोतीबिंदू असे म्हणतात. त्याला 'सायलेंट थीफ ऑफ व्हिजन' असं नावही देण्यात आलं आहे. काचबिंदूमुळे दृष्टी खराब होते आणि अंधत्व येण्याची शक्यता असते. तुम्हाला काचबिंदूचा त्रास आहे की नाही हे शोधण्यासाठी, डोळयातील पडदा, डोळा दाब आणि इतर स्कॅन आणि चाचण्या कराव्या लागतात. डोळ्यांशी संबंधित हा आजार लहान मुलांमध्ये जन्मजात किंवा नंतर होऊ शकतो. डोळा मोठा होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, जास्त तेजस्वी प्रकाशात पाहता न येणे, डोळ्याच्या बाहुलीमध्ये पांढरे डाग दिसणे ही याची काही लक्षणे असू शकतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Fungal Infection : कोरोना नाही तर 'या' संसर्गामुळेही मृत्यूचं तांडव! कोविड विषाणूला टाकलं मागे; धक्कादायक अहवाल समोर