Fungal Infection Risk : एकीकडे जग (World) अद्यापही कोरोनातून (Covid-19) सावरण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तीन वर्षात कोरोना महामारीने (Coronavirus) जगाची चिंता वाढवली. या महामारीचे वाढते रुग्ण, मृत्यूचे प्रमाण यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. पण, आता आणखी एका संसर्गामुळे चिंता वाढली आहे. या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या दशकात जगभरात बुरशीजन्य संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दुपटीने वाढली आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, आता दरवर्षी 38 लाख लोक बुरशीजन्य संसर्गामुळे मरतात, तर दहा वर्षांपूर्वी ही संख्या 20 लाख होती, हा आकडा एकूण जागतिक मृत्यूच्या सुमारे 6.8 टक्के आहे.


कोरोना नाही तर 'या' संसर्गामुळेही मृत्यूचं तांडव! 


शास्त्रज्ञांच्या अभ्यासात समोर आलं आहे की, गेल्या दशकात जगभरात बुरशीजन्य संसर्गामुळे होणारे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून ते दुप्पट झालं आहे. शास्त्रज्ञांचा अंदाजानुसार, दरवर्षी होणाऱ्या 20 लाख मृत्यूंपैकी आता दरवर्षी सुमारे 38 लाख मृत्यू बुरशीजन्य संसर्गामुळे होत आहेत. ही आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे.


'या' संसर्गाने कोविड विषाणूला टाकलं मागे


अहवालातील आकडेवारीनुसार, एकूण जागतिक मृत्यूंपैकी 6.8 टक्के मृत्यू बुरशीजन्य संसर्गामुळे होत आहेत. दरम्यान, हृदयविकारामुळे जगभरात 16 टक्के मृत्यू होतात, त्याशिवाय 11 टक्के मृत्यू स्ट्रोकमुळे होतात. इतकंच नाही तर 6 टक्के मृत्यू धूम्रपान-संबंधित फुफ्फुसाचा आजार (COPD) आणि बुरशीजन्य संसर्गामुळे होतात, जे दरवर्षी 32 लाख 28 हजार मृत्यूंपैकी जवळजवळ एक तृतीयांश मृत्यूचा भाग आहेत.


अहवालात धक्कादायक माहिती समोर


लॅन्सेट संसर्गजन्य रोग या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाने बुरशीजन्य संसर्ग आणि त्यावरील उपचार यासंदर्भातील महत्त्वाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार, यापैकी अनेक रुग्णांचा मृत्यू डॉक्टरांना आजारांचं मूळ कारण न समजल्याने होत आहे. रुग्णाला बुरशीजन्य संसर्ग झाल्याचं समजत नाही किंवा हे समजण्यात खूप उशीर होतो.


संशोधकांनी सांगितलं आहे की, गेल्या 10-15 वर्षांत बुरशीजन्य रोगांचे निदान होण्याचं प्रमाण वाढलं आहे, पण या चाचण्या आणि वापर मर्यादित आहे आणि हे कमी उत्पन्न असलेल्या देशांपुरतेच मर्यादित नाही. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग आढळून आले आहेत, पण काही सर्वात सामान्य बुरशीजन्य संसर्गाबाबत अधिक माहिती सापडलेली नाहीत, ज्यामुळे जागतिक स्तरावर मृत्यूचं प्रमाण वाढत आहेत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Eye Care : डोळ्याचा 'सायलेंट किलर'! 'या' आजारावर कोणताही उपचार नाही, लक्षणेही नाही; कायमचं अंधत्व येईल