Menstrual Cycle: महिलांना येणारी मासिक पाळी (Menstrual) ही नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो किंवा आपल्याला भूक लागते त्याप्रमाणेच मासिक पाळी येणे नैसर्गिक (Natural) आहे. तरीही काही लोकांना याबाबत बरेच संभ्रम आहेत. काही जण याला महिलांना होणारा आजार (Disease) म्हणून बोलतात. आजही लोकं या विषयावर तितक्या मोकळेपणाने बोलत नाहीत. 


मासिक पाळी दरम्यान नेमकं काय होतं? 


मासिक पाळी दरम्यान महिलांच्या गर्भाशयातील अंड फुटते आणि त्यातून रक्तस्त्राव होतो. मासिक पाळीचा कालावधी हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. एका मासिक पाळीचा संपूर्ण कालावधी हा 21 ते 25 दिवसांचा असतो. मासिक पाळी ही साधारण वयाच्या 12 वर्षांपासून सुरू होते. काही मुलींना ती लवकर सुद्धा येते. 



मासिक पाळीच्या काळात मुलींना अनेक प्रकारच्या असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या काळात मुलींमध्ये खूप अशक्तपणा असतो.  हार्मोनल बदल होत असल्यामुळे पाठ, पोट आणि कंबरेत जास्त वेदना  होतात. जास्त वेदना देणाऱ्या मासिक पाळीला डिसमेनोरिया देखील म्हणतात म्हणतात.


डिसमेनोरियाचे प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार असतात. 


प्रायमरी  डिसमेनोरिया


ज्या महिलांना मासिक पाळीच्या आधी आणि मासिक पाळीच्या दरम्यान खूप वेदना होतात. त्याला प्रायमरी  डिसमेनोरिया म्हणतात. या काळात महिलांना असह्य वेदना होतात.


सेकंडरी डिसमेनोरिया


यामध्ये गोष्टी थोड्या वेगळ्या होतात. यामध्ये  स्त्रिया किंवा मुली  मासिक पाळीच्या सुरुवातीला ठिक असतात परंतु नंतर वेदना जाणवू लागतात. अशा स्थितीला सेकंडरी डिसमेनोरिया म्हणतात.


या भागात जाणवतात जास्त वेदना


एंडोमेट्रिओसिस (Endometriosis)


गर्भाशयाच्या बाहेरील म्हणजे फॅलोपियन ट्यूब, अंडाशय किंवा ओटीपोटामध्ये वेदना होतात.


युटेरस फायब्रॉईड्स (Uterine Fibroids)


गर्भाशयामध्ये कर्करोग नसलेल्या टिशूंची वाढ होत असल्याने मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होतात.


ओटीपोटाचा दाह रोग (Pelvic Inflammatory Disease)


शारीरिक संबंधावेळी संक्रमित होणाऱ्या जीवाणूंमुळे गर्भाशयात इंफेक्शन होते. त्यामुळे देखील महिलांना  प्रचंड त्रास सहन करावा लागतो. 


 एडेनोमायोसिस(Adenomyosis)


गर्भाशयातील टिशूंचे  स्नायूंच्या टिशूंमध्ये रुपांतर होते. त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावू लागते आणि खूप वेदना होतात.


सर्वाइकल स्टेनोसिस (Cervical Stenosis)


काही महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाचे उघडणे फारच लहान असते. त्यामुळे मासिक पाळीत रक्तप्रवाहात अडचण येते. त्यामुळे गर्भाशयावर खूप दबाव येतो. त्यामुळे महिलांना तीव्र वेदना होतात. यामुळेच मासिक पाळी दरम्यान महिलांना ओटीपोटात तीव्र वेदना होतात. त्यामुळे पाठदुखीही होते. तसेच महिलांनी या काळात योग्य काळजी घेतल्यास होणारा त्रास कमी होऊ शकतो. 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Garlic Side effects: तुम्ही भाजीत जास्त प्रमाणात लसूण वापरताय? आरोग्यावर होईल 'असा' परिणाम