Digital Dementia: तुम्ही डिमेंशिया (Dementia) ऐकलं असेल, पण तुम्ही डिजिटल डिमेंशिया (Digital Dementia) ऐकलंय का? सध्या आपल्यापैकी प्रत्येकाचंच आयुष्य गॅजेट्सभोवती फिरू लागलं आहे. आपण आपल्या दिवसाचा सर्वाधिक वेळ स्क्रीनवरच घालवतो. विशेषतः स्मार्टफोन आल्यानंतर स्क्रिन टायमिंगमध्ये फारच वाढ झाली आहे. लोक तासन् तास लॅपटॉप (Laptop), टीव्ही (TV) आणि स्मार्टफोनच्या स्क्रिनवर घालवतो. प्रोढांसह तरुणांमध्ये तर स्क्रिन टाईम वाढला आहेच, पण लहान मुलांमध्येही स्क्रिन टाईमचं प्रमाण वाढलं आहे. अनेक लहान मुलांना फोनची सवय लागली आहे. विशेषतः कोरोना आणि लॉकडाऊन यानंतर सर्वांचाच स्क्रिन टाईम वाढला आहे. याचा परिणाम आरोग्यावरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. या कारणानं लहान मुलांमध्ये डिजिटल डिमेंशिया (Digital Dementia) आजाराचा धोका वाढला आहे. जाणून घेऊया सविस्तर... 


डिजिटल डिमेंशिया किती घातक? (How Dangerous is Digital Dementia?)


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मेंदूची कार्य करण्याची क्षमता कमी होते, याला डिजिटल डिमेंशिया म्हणतात. याचा अर्थ असा की, जर तुम्ही स्क्रीनवर जास्त वेळ घालवला तर अनेक इमेज, व्हिडीओ, ॲप्स तुमच्या मेंदूवर एकाच वेळी अटॅक करतात. त्यामुळे सर्व काही लक्षात ठेवणं मनाला शक्य होत नाही. मन नेहमी गोंधळलेले असतं. 


डिजिटल डिमेंशियाची लक्षणं (Symptoms of Digital Dementia)



  • गोष्टी विसरणं 

  • एकाग्रता कमी होणं

  • गोष्टी लक्षात न राहणं

  • एकाग्र होताना अडचणी 

  • पर्फॉर्मन्सची कमतरता 


डिजिटल डिमेंशियापासून मुलांचा बचाव कसा कराल? 



  • लहान मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा. त्यांना दोन तासांहून अधिक स्क्रिन पाहू देऊ नका. त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. 

  • डिजिटल गॅजेट्सवर जास्त वेळ घालवू देऊ नका. 

  • मुलांना मैदानी खेळांची गोडी लावा, तसेच, घरबसल्या बैठे खेळ शिकवा

  • नव्या भाषा, डान्स, म्युझिक, कराटे अशा क्लासेसना मुलांना पाठवा

  • जेव्हा मुलं जास्त वेळ स्क्रिन पाहतात, त्यावेळी त्यांना लठ्ठपणासारख्या समस्या होतात. त्यामुळे त्यांच्या फिजिकल अॅक्टिविटी वाढवा. 

  • मुलं त्यांच्या पालकांकडून खूप काही शिकतात. अशा वेळी त्यांना पुस्तक वाचण्याची सवय लावा. 

  • मुलांना कोडी खेळ खायला द्या, नंबर गेम त्यांच्या मेंदूसाठी चांगले आहेत. त्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होतो आणि त्यांची लक्षात ठेवण्याची क्षमताही वाढते.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


वय 93 वर्ष, पण फिटनेस 40 वर्षांच्या माणसासारखा; 'या' 93 वर्षांच्या आजोबांचा फिटनेस तुम्हाला चक्रावून सोडेल