Dengue Deadly Type : पावसाळा (Monsoon) संपल्यानंतर आता हिवाळ्याची (Winter) चाहूल लागली आहे. पावसाळा (Rainy Season) संपल्यानंतर डेंग्यूच्या रुग्ण (Dengue Patient) मध्ये सातत्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे. यातच आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. एकीकडे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे डेंग्यूचा जीवघेणा प्रकार समोर आला आहे. डेंग्यूचा हा प्रकार तुमच्या मेंदूची कार्यक्षमता नष्ट करू शकतो, यामुळे आता प्रशासनासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याचा लांब कोविडशी संबंध असल्याचेही सांगितले जात आहे. यासंदर्भात (Rare Dengue Encephalitis Baffles Telangana Health Officials) सविस्तर जाणून घ्या.


डेंग्यूचा अत्यंत जीवघेणा प्रकार


डेंग्यू (Dengue) चा दुर्मिळ आणि सर्वात धोकादायक प्रकार समोर आला आहे. डेंग्यू (Dengue Fever) चा हा अतिशय धोकादायक प्रकार हजारोपैकी केवळ एका व्यक्तीमध्ये दिसून येतो. यामध्ये डेंग्यू (Dengue virus) चा विषाणू मेंदू (Brain) पर्यंत पोहोचतो आणि मध्यवर्ती मज्जासंस्था (Central Nervous System) वर परिणाम करतो. डेंग्यूच्या या अत्यंत धोकादायक प्रकाराचे नाव डेंग्यू एन्सेफलायटीस (Dengue Encephalitis) आहे. हैदराबादमध्ये दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत ज्यात रुग्णालयाच्या कनिष्ठ डॉक्टरमध्ये लक्षणे दिसून आली आहेत. तर, दुसरी घटना 16 वर्षीय मुलीची असून ती व्हेंटिलेटरवर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा आजार.


डेंग्यू एन्सेफलायटीस म्हणजे काय? What is Dengue Encephalitis


डेंग्यू एन्सेफलायटीस हा डेंग्यू शॉक सिंड्रोम आहे. म्हणजेच आतापर्यंत डेंग्यूची मेंदूशी संबंधित लक्षणे लोकांमध्ये दिसली नाहीत, पण डेंग्यूच्या या प्रकारात डेंग्यूच्या विषाणूचा परिणाम मेंदूवर होतो. डेंग्यू एन्सेफलायटीसमुळे लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसतात. डेंग्यू एन्सेफलायटीस हा दुर्मिळ आजार आहे. या आजारात अनेक न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसतात.


डेंग्यू एन्सेफलायटीसची लक्षणे Dengue Encephalitis Symptoms



  • डेंग्यू एन्सेफलायटीस म्हणजेच डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये व्यक्तीला झटके येतात.

  • मज्जासंस्थेवर परिणाम होऊ दुसरी मज्जासंस्था खराब होते.

  • अनेक वेळा व्यक्ती कोमात जाते.

  • व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याच्या शक्तीवर परिणाम होतो.

  • शेवटी व्यक्ती मेंदूशी संबंधित अनेक लक्षणांना बळी पडते.


डेंग्यू एन्सेफलायटीस आणि लाँग कोविडचा संबंध काय? Dengue Encephalitis and Long Covid 


डेंग्यू एन्सेफलायटीस (Dengue Encephalitis) चा लाँग कोविडशी कनेक्शन जोडलं जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, डेंग्यू एन्सेफलायटीसचा कोविडशीही संबंध आहेत. कोरोनानंतर शरीरात अनेक बदल झाले आहेत. यामुळे आपली प्रतिकारशक्ती प्रभावित झाली असून याचा आपल्या जनुकांवरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत डेंग्यूच्या प्रकारातही बदल झाला असून, त्याचा परिणाम थेट मेंदूवर होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.


लाँग कोविड म्हणजे काय? What is Long Covid?


लाँग कोविड यालाच दिर्घकालीन कोविड असंही म्हटलं जातं. लाँग कोविड म्हणजे कोरोना व्हायरसची लागण होऊन गेल्यानंतरही त्याचा परिणाम जाणवतो. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिर्घकाळ याची लक्षण दिसून येतात. यामध्ये धाप लागणे किंवा लवकर थकवा येणे, सतत खोकला येणे, स्नायू दुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, ऐकू कमी येणे, चव न कळणे या समस्यांचा समावेश आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या संबंधित बातम्या :


Ajit Pawar Dengue : अजित पवारांना डेंग्यूची लागण, खासदार प्रफुल्ल पटेल यांची ट्विटद्वारे माहिती