मुंबई : पाळीव प्राण्यांमधील (Pets) एका रहस्यमय आजारामुळे ब्रिटनमध्ये (UK) भीतीचं वातावरण आहे. या रहस्यमय आजारामुळे पशुवैद्यही हैराण झाले आहेत. ब्रिटनमधील पाळीव प्राण्यांचा मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे (Flesh Eating Bacteria) मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आजारापासून सावध राहण्याचा इशारा, कुत्रा पाळणाऱ्या मालकांना सरकारकडून देण्यात आला आहे. 


पाळीव कुत्र्यांमध्ये प्राणघातक संसर्गाचा धोका


ब्रिटनमध्ये वाढत असलेल्या रहस्यमय अलाबामा रॉट रोगाची (Flesh Eating Alabama Rot) सुरुवात त्वचेच्या विचित्र जखमेने होते, पण या आजाराची लागण नेमकी कशामुळे होते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच, या आजारावर सध्या कोणताही इलाज उपलब्ध नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रोग कुत्र्यांमधील संसर्गामुळे पसरत नाही, पण काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. 


मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाचा संसर्ग


गेल्या काही महिन्यांत ब्रिटनमध्ये पाळीव प्राण्यांमध्ये विशेषत: पाळीव कुत्र्यांमध्ये रहस्यमय प्राण्यांचा मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाची लागण झाल्याची प्रकरण समोर आली आहेत. या आजाराचा अलाबामा रॉट असं नाव देण्यात आलं असून मागील काही दिवसांमध्ये याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहेत. या रोगामध्ये सुरुवातीला प्राण्यांच्या त्वचेवर जखमा होतात. हा बॅक्टेरिया मूत्रपिंडावर देखील हल्ला करू शकतो. 


या आजाराचं नेमकं कारण काय?


अलाबामा रॉट (Alabama Rot) आजाराचं नेमकं कारण काय, अलाबामा रॉट आजाराची लागण किंवा संसर्ग नेमका कशामुळे होतो, याबाबत कोणताही माहिती उपलब्ध नाही. सध्या या आजारावर कोणतेही उपचार नाहीत. पण, तज्ज्ञांच्या मते, या बॅक्टेरियाचा संबंध चिखलाशी असू शकते.


अलाबामा रॉटच्या प्रकरणांमध्ये वाढ


यूकेमध्ये 2012 पासून याची सुमारे 324 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दरवर्षी सरासरी 25 प्रकरणांची नोंद होते. पण, चिंताजनक बाब म्हणजे, यावर्षी आतापर्यंत याची 15 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 


अलाबामा रॉट म्हणजे काय?


अलाबामा रॉट म्हणजेच मांस खाणारा जीवाणू एक दुर्मिळ पण प्राणघातक संसर्ग आहे. हा जीवाणू रोगप्रतिकारक प्रणाली कमी असलेल्या कुत्र्यांसाठी विशेषतः धोकादायक ठरु शकतो. या जीवाणू मांस खातो, ज्यामुळे जखम वाढत जाते. या आजारावर अद्याप कोणतेही उपचार नाहीत.


लागण होण्याचा धोका कुणाला?


कुत्र्यांची कोणतीही प्रजाती, आकार किंवा कोणत्याही वयाच्या कुत्र्यांना याची लागण होऊ शकते. हा अत्यंत रोग संसर्गजन्य नाही, म्हणून कुत्रे एकमेकांमध्ये पसरू शकत नाहीत. याची लागण किंवा संसर्ग टाळण्याचे चार मार्ग आहेत.


कुत्र्यांना बाहेर फिरायला नेताना काळजी घ्या


अलाबामा रॉटचा संसर्ग नेमका कशामुळे सुरू झाला, याबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. काही संशोधकांच्या मते, हा संसर्ग E.coli सारख्या जीवाणूमुळे होऊ शकतो. कुत्र्याला ओल्या, दमट आणि चिखलाच्या वातावरणात चालण्यासाठी नेणं टाळा.


कुत्र्यांची तपासणी करा


हा आजार आणि संसर्गाबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे यापासून विशिष्ट प्रतिबंध सल्ला देणं कठीण आहे. अलाबामा रॉटसाठी कोणतेही उपचार किंवा लस सध्या उपलब्ध नाही. पाळीव प्राण्यांना जखमा आहेत की नाही, याची दररोज तपासणी करा. दररोज कुत्र्यांवर कोणत्याही जखमा दिसल्यास त्यांना त्वरीत डॉक्टरांकडे न्या.