Coffee Side Effects: चहा-कॉफी असे पेय आहेत, ज्याचे जगभरात अनेक चाहते आहेत. अनेक जणांना सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी न चुकता सेवन करतातच.. काही लोक इतके चाहते असतात की ते सकाळी आणि संध्याकाळी हे पेय पितात, तर काही लोक दिवसाच्या कोणत्याही वेळी पितात. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कॉफी आरोग्यासाठी हानिकारक आणि फायदेशीर दोन्ही आहे. ते तुमच्या पिण्याच्या पद्धतीवर आणि तुम्ही दररोज किती डोस घेत आहात यावर अवलंबून आहे. कॉफी प्यायल्याने आरोग्य आणि ऊर्जा मिळते. कॉफी प्यायल्याने मन ताजेतवाने होते आणि तुम्हाला आरामही मिळतो. मात्र काही लोकांसाठी ही कॉफी अत्यंत हानिकारक आहे. जाणून घेऊया सविस्तर..
दिवसातून एक कपपेक्षा जास्त कॉफी पिताय? आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एडो पाझ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कॉफी पिणे हृदयाच्या रुग्णांसाठी तितके फायदेशीर नाही, जितके इतर लोकांसाठी आहे. कारण कॉफी प्यायल्याने रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, ही सर्व हृदयविकाराची लक्षणे आहेत. नियमितपणे दिवसातून एक कपपेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने कोलेस्टेरॉल वाढते, जे हृदयविकाराचे आणखी एक कारण आहे. याव्यतिरिक्त, ते असेही म्हणतात की गोड कॉफी हृदयरोग्यांसाठी अधिक हानिकारक आहे.
गोड कॉफी अत्यंत धोकादायक?
हृदयाचा आजार असलेल्यांनी गोड कॉफी टाळावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. साखरयुक्त कॉफी या लोकांचे आरोग्य आणखी बिघडवते. खरं तर, साखर, कारमेल, कोको पावडर किंवा चॉकलेट मिसळून कॉफी प्यायल्याने शरीरातील कॅलरीज आणि अस्वास्थ्य चरबीची पातळी वाढते. सिरप कॉफी किंवा रेडी टू इट कॉफी पिणे हृदयरोग्यांसाठी अधिक घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कॉफी हानिकारक का आहे?
आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, खरं तर, गोड किंवा साखरयुक्त कॉफी प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. साखर किंवा साखरेची चव असलेली कॉफी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात. तज्ज्ञ हृदयरुग्णांना त्यांच्या रोजच्या आहारात कॉफीचे सेवन कमी करून गोड कॉफीपासून पूर्णपणे दूर राहण्याचा सल्ला देतात. हे लोक सकाळी कॉफी पिऊ शकतात. कॉफी पिण्यापूर्वी 2-3 ग्लास पाणी प्या.
हेही वाचा>>>
Weight Loss: आता घरबसल्या सहज वजन कमी करू शकता? फिटनेस तज्ज्ञांच्या 'या' 5 सोप्या टिप्स, फरक पाहून व्हाल आश्चर्यचकित
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )