Clapping Therapy: आपण बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. तसेच अनेक आनंदाच्या क्षणाला आपण टाळ्या वाजवतो. टाळ्या वाजवण्याचे देखील आरोग्याला होणारे फायदे होतात, हे देखील अनेकांना माहिती नसते. क्लॅपिंग थेरेपी म्हणजेच टाळ्या वाजवण्याच्या थेरेपी. ही थेरेपी कशी करतात? त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो. त्याबद्दल जाणून घेऊयात...
क्लॅपिंग थेरेपीचे फायदे:
तणाव आणि नैराश्याचा सामना करणारे लोक क्लॅपिंग थेरिपी करु शकतात. सकाळी नियमितपणे क्लॅपिंग थेरेपी केल्यानं तुमच्या मेंदूला पॉझिटीव्ह सिग्नल्स मिळतात. ज्यामुळे तणाव कमी होतो आणि तुमचे मन शांत होते. क्लॅपिंग थेरेपीमुळे लहान मुलांची स्मरणशक्ती देखील वाढवते.
दररोज सकाळी उठल्यानंतर 20 ते 30 मिनिटे क्लॅपिंग थेरेपी केल्याने तुमची इम्युनिटी वाढण्यास मदत होते. टाळ्या वाजवल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा चक्र सक्रिय होते. टाळी वाजवल्याने शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढतात.
त्वचेसाठी फायदेशीर: क्लॅपिंग थेरेपी त्वचेसाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते. टाळ्या वाजवल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते, त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाहही चांगला राहतो, त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते.
टाळ्या वाजवून तुम्ही तुमचे हृदय निरोगी ठेवू शकता, तुमच्या हातात 29 एक्यूप्रेशर पॉइंट्स असतात, टाळ्या वाजवल्याने त्या सर्वांवर दबाव येतो, ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
कशी करावी क्लॅपिंग थेरेपी?
क्लॅपिंग थेरेपी करण्यासाठी हाताला मोहरी किंवा खोबरेल तेल लावा. तळहाताचा खालचा भाग आणि बोटे एकमेकांना स्पर्श करतील, अशा पद्धतीनं टाळ्या वाजवा. दिवसातून 1500 टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करा. क्लॅपिंग थेरेपी ही तुम्ही सकाळी करु शकता तसेच ही थेरेपी तुम्ही दिवसभरात कधीही करु शकता. तुम्ही रोज जेवल्यानंतर क्लॅपिंग थेरेपी करु शकता. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.