Children Mental Health : मुलांच्या शारीरिक आरोग्याकडे (Physical Health) सगळेच पालक लक्ष देतात. मात्र, त्यांच्या मानसिक आरोग्याकडे (Menatal Health) म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. लहान मुलांच्या मुलांच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर सांगतात. 


दैनंदिन जीवनातील विविध घटक मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. ज्या घरात सततची भांडण, आरडाओरड, नातेसंबंधात कटूता आढळते अशा मुलांना  चिंता, नैराश्य, वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि नैराश्याचा सामना करावा लागतो. घरच्यांकडून शैक्षणिक अपेक्षांच्या ओझ्यामुळे चिंता आणि तणावाची भावना निर्माण होऊ शकते. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळे विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, ज्यामुळे मुलांमध्ये सायबर क्राईम आणि नकारात्मकता सारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. दिवसेंदिवस स्क्रीन टाइम वाढत असून मैदानी खेळांपासून तसेच शारीरीक हलचालींपासून मुलं दूर राहत असल्याची बाब समोर येत आहे. 
 
पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. चिडचिड, सामाजिक सहभाग कमी होणे किंवा मूड स्विंग्ज सारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये, असे बालरोग तज्ज्ञ डॉ दीपक उगरा यांनी सांगितले. अशा प्रकारची लक्षणे आपल्या मुलाला मानसिक आधाराची गरज असल्याचे सूचित करतात. चिंता किंवा नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांची देखील लक्षणे दिसून येतात. शैक्षणिक गुणवत्तेत होणारी घट किंवा त्यांनी एकदा उपभोगलेल्या क्रियांमधील रस कमी होणे हे देखील धोक्याचे संकेत देत असल्याचे त्यांनी सांगितले. खाण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतींमध्ये होणारा बदल, वारंवार डोकेदुखी किंवा पोटदुखी हे देखील आपले मुल तणावाचा सामना करत असल्याचा संकेत देत असल्याचे डॉ. उगरा यांनी म्हटले. 
 


>> मुलांना तणावाचा सामना करण्यास पोषक वातावरण कसे तयार कराल?


> आपल्या मुलांना निर्णय घेण्याची संधी देणे त्यांच्यावर विश्वास दर्शविल्या तसेच त्यांना त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहित केल्याने त्यांना सुरक्षितता आणि आपलेपणाची भावना वाढीस लागते.


> तणाव आणि आव्हानांना सामोरे जाताना सकारात्मक वर्तन अंगीकारणे आवश्यक आहे. 


> नियमित शारीरिक हालचाल, पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप यांचा समावेश असलेली दिनचर्या तयार केल्याने मुलाच्या सर्वांगीण आरोग्यास हातभार लागतो. 


> श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा ध्यानधारणा केल्याने मुलांना तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करण्यास मदत होऊ शकते.


> पालकांनी स्क्रीन टाईमकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शारीरिक आणि सामाजिक विकासास प्रोत्साहन देणाऱ्या कृतींना प्रोत्साहन द्यावे. त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे.


> मुलांना तंत्रज्ञानाशी जूळवून घेताना त्याचा गैरवापर करु नये याबाबत मार्गदर्शन करावे. तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. त्याकरिता योग्य वापर करणे गरजेचे आहे.


> निरोगी सवयी जोपासताना पालकांनी मुलांना त्यांच्या स्क्रीन टाईमबद्दल माहिती देणे तसेच योग्य निवडीबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.


> मुलांमधील शैक्षणिक ताणतणाव दूर करण्यात मदत करण्यासाठी पालकांद्वारे मुक्त संवाद साधणे आवश्यक आहे. 


> पालकांनी मुलांच्या भावना जाणून घेणे, त्यांना भावनिक आधार देणे आणि कठीण परिस्थितीतही हार न मानता लढण्यास शिकविणे गरजेचे आहे.


(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. आरोग्यविषयक सल्ला, औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने करावेत.)