Carbohydrates Food : वर्क फ्रॉम होममुळे गेली दोन वर्ष सगळेच घरून काम करत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणा वाढतोय. योग्य आणि समतोल आहार आणि व्यायाम हे त्रिकुट व्यवस्थित साधणं अत्यंत महत्वाचं आहे, हे साधण्यासाठी कमी कार्बोदकेयुक्त आहार हा घ्यायला हवा आणि रोजच्या जीवनात त्याचा अवलंब करावा. पण प्रश्न हा पडतो की असा आहार आणि जीवनशैली आयुषभर जोपासता येईल का? तर ह्याच उत्तर आहे – हो ..!!
दक्षिण अमेरिकन शास्त्रज्ञ व केपटाऊन विद्यापीठातील स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रोफेसर टिम नोक्स यांनी कमी कार्बोदके ह्या आहारा बद्दल माहिती दिली आहे. ते म्हणतात, हे नवीन न्यूट्रिशन सायन्स आहे, जे स्वीकारण्यासाठी भारतात अजून तीस वर्षे लागतील. पण, जर प्रश्न तुमच्या आरोग्याचा असेल, तर तुम्ही आजच ते स्वीकारा, ते डॉक्टरांकडून  मिळावं ह्याची वाट पाहायला तुम्हाला 30 वर्षे थांबायची गरज नाही.”  कमी कार्बोदकेयुक्त आहार हा तुम्हाला तुमच्या सर्व चयापचय विकृतींपासून (Metabolic health) मुक्त होण्यास मदत करतो. कार्बोदकेयुक्त आहाराचे महत्व सांगितलेय कार्डियो-मेटाबोलिक , स्पोर्ट्स न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि  तज्ज्ञ डॉक्टर मृदुल कुंभोजकर यांनी. 


कार्बोदके खाल्ल्यावर ते शरीरात कसं कार्य करतात?
कार्बोदकेयुक्त  पद्धर्थांचं अतिरिक्त सेवन केल्यावर, शरीरात त्यांचं लगेच साखरेमध्ये विघटन होतं व त्यामुळे रक्तात साखरेची पातळी  वाढते आणि इंसुलिन सक्रिय होते, ज्याला आपण sudden Insulin spike म्हणतो.  आता जितक्या लवकर कार्बोदके विघटित होतील, तितक्या लवकर ग्लुकोज (साखर) रक्तात वाढेल, आणि हेच घातक ठरतं.  कार्बोदकेंचं डायरेक्ट रूपांतर हे ग्लुकोज मध्ये होतं. 


मॅक्रोन्यूट्रिएंट्स:-
कर्बोदकांचं (Carbs) अतिरिक्त सेवन केल्यावर, त्याचं लगेचच साखरेत (ग्लुकोज) रूपांतर होतं, ज्याला आपण Simple sugars म्हणतो. हे सिम्पल कार्ब्स रक्तात लगेच मिसळतात  आणि अचानक रक्तात ग्लुकोज ची  वाढ होते. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट (सर्व धान्य) असतील तर  ते उशीरा रक्तात विघटित होतात, पण त्यांचं ही  रूपांतर  साखरेत होतं.  सरतेशेवटी विघटन  होऊन  कार्बोदकेंचं  उत्पादन (By product) फक्त साखर आहे. 


प्रथिने (Proteins) खाल्ल्यावर त्यांचं विघटन प्रथम अमीनो ऍसिडमध्ये होतं आणि नंतर साखरेमध्ये होतं. ह्याचाच अर्थ त्यांना साखरेमध्ये विघटीत व्हायला खूप वेळ लागतो. प्रथिने हे स्नायू बळकट बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. मात्र , प्रथिन्यांचा वापर हा ऊर्जेसाठी  करू नये, शरीरात जेव्हा स्ंनयुंची किंवा हाडांची  झीज होते, तेव्हा प्रथिनेयुक्त आहार घेणं गरजेचं असतं. शरीराला १gm/kg बॉडी वेट इतक्या प्रमाणात प्रथिने लागतात. 


स्निग्ध ( Dietary fats) पदार्थांचे सेवन केल्यावर ते पहिले फॅटी अॅसिड्समध्ये विघटित होते आणि नंतर ग्लुकोज मध्ये.  आहारातून घेतलेली चरबी आणि शरीरातील चरबी ह्यात खूप फरक आहे.  त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. शरीतातील चरबी ही कार्बोदके पासून बनलेल्या साखरेमुळे होते आणि आपली बैठी कामं असल्याने ती साठत जाते आणि वाढते. 
यानुसार, चरबी किंवा प्रथिने पेशींना ताकद देण्यासाठी शरीरात हळूहळू ग्लुकोज पुरवतात आणि पटकन  इन्सुलिन वाढवत नाहीत. (no sudden sugar spike). त्यामुळे कर्बोदकांचे सेवन करण्यापेक्षा फॅटी-प्रोटीन आहार घेणे सरावात असावे.


कमी – कार्बोदकेंचा आहार घेतल्याने  खलील गोष्टी साध्य करता येऊ शकतात : -
• रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते 
• रक्तातील साखरेची पातळी कमी होते 
• हार्मोनल असंतुलन होत नाही 
• इन्शुलीन चा प्रतिकार कमी होतो 


आपल्या शरीरात  बेसल (basal) आणि  बोलस (bolus) इंसुलिन असतं. बेसल म्हणजे ऑलरेडी शरीर इन्शुलीन  तयार करतं, तुम्ही अन्न खा अथवा नका खाऊ. बोलस इन्शुलीन म्हणजे शरीरात जर अतिरिक्त साखर असेल तर ती नियंत्रणात ठेवायला स्वादूपिंडातून इन्शुलीन स्त्रावीत होते आणि ग्लुकोज नियंत्रित ठेवते. आता हे बोलस इंसुलिन वाढवू न देणे हे अर्थातच आपल्या हातात आहे. कमी करबोदकेंचा आहार हीच आपली जीवनशैली ठेवली तर, टाइप 2 मधुमेह, पी.सी.ओ.एस., थायरोईड आणि हृदयविकार ह्या अश्या रोगांचा धोका कमी होतो. हृदयविकार रोगांचे प्रमुख कारण हे अतिरिक्त साखर किंवा पिष्टमय पद्धर्थांचं सेवन केल्यामुळे होते, स्निग्ध पद्धर्थंमुळे (Dietary fats) नाही. तर, माझ्या प्रिय मित्रांनो, LCHF (लो कार्ब -हाय फॅट) जीवनशैलीचा सराव करूया. पुढील 30 वर्षांची वाट न पाहण्यापेक्षा तुम्ही सर्वजण ह्या जीवनशैलीचा अवलंब करा , आणि ह्याचा नक्कीच फायदा शरीराला होईल , ह्याची मी ग्वाही देते..