Brain Stroke: भारतात लाखो रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकची समस्या आढळून आली आहे. स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे. यालाच मराठीत पक्षाघात असे म्हणतात. जी कोणालाही, कुठेही आणि कधीही येऊ शकते. या स्थितीत तुमच्या मेंदूच्या विशिष्ट भागातील रक्तप्रवाह विस्कळीत होतो. त्यामुळे मेंदूच्या पेशी मृत पावतात, ज्यामुळे तुमच्या मेंदूची आवश्यक कार्ये करण्याची क्षमता बिघडू शकते. या अवस्थेमुळे होणाऱ्या जीवघेण्या गुंतागुंत समजून घेणे, जोखीम घटक जाणणे आणि वेळेवर निदान व उपचार करणे आवश्यक आहे. याबाबत डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलचे न्यूरो फिजिशियन आणि स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. राहुल जानकर यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या..


हिवाळ्यात स्ट्रोकची प्रमुख कारणं कोणती?


उच्च रक्तदाब - तापमानातील थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे तुमचा रक्तदाब लक्षणीयरित्या वाढू शकतो. हिवाळ्यात तुमची भूक वाढू शकते, ज्यामुळे खारट, तेलकट पदार्थांचे सेवनही वाढते. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका आणखी वाढू शकतो, जो स्ट्रोकच्या कारणीभूत घटकांपैकी एक आहे.


शारीरिक हालचालींचा अभाव - तापमानात घट झाल्याने बरेच लोक हिवाळ्याच्या दिवसात क्वचितच घराबाहेर पडतात, ज्यामुळे शारीरिक हालचालीचे प्रमाण कमी होते. यामुळे अचानक वजन वाढणे आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे येणे तसेच स्ट्रोकची शक्यता वाढते.


डिहायड्रेशन - थंड हवामानामुळे तुमच्या शरीरात लघवीद्वारे जास्त पाणी कमी होऊ शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. हे तुमच्या त्वचेला आणि मूत्रपिंडास होणारा रक्तप्रवाह कमी करते. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होऊ शकते आणि रक्त गोठण्याचा धोका वाढतो. यामुळे तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाहात व्यत्यय येऊ शकतो आणि स्ट्रोकची समस्या उद्भवते.


स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी..


शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने तुमचा रक्त प्रवाह सुरळीत होतो.
संतुलित आहाराचे सेवन करा तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. 
खारट किंवा चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.
श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी यांसारख्या क्रियाकलापांमध्ये गुंतून तुमची तणावाची पातळी व्यवस्थापित करा.
हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.
कारण ते रक्तप्रवाह सुरळीत प्रवाह राखून तुमचे रक्त पातळ करण्यास मदत करते.
वेळोवेळी रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घ्या आणि स्ट्रोक टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करा.


स्ट्रोकचा धोका कसा टाळाल?


हिवाळा ऋतू हा फ्लू आणि सर्दी यांसारख्या श्वसन संक्रमणांच्या वाढत्या प्रसारास कारणीभूत ठरतो. 
संक्रमणांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण येऊ शकतो 
आणि यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. 
म्हणूनच फ्लू लसीकरण करणे 
श्वसनासंबंधी विकार दूर करत प्राणायम तसेच मेडिटेशनचा सराव केल्यास फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखता येते.


हेही वाचा>>>


Heart Attack चा धोका कोणाला जास्त? शाकाहारी की मांसाहारींना? लठ्ठ कि पातळ लोकांना? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )