Bokavirus : बोकाव्हायरसचा पहिला रुग्ण 2005 मध्ये आढळला होता. बोकाव्हायरसमध्ये टाईप एक, टाइप दोन आणि टाइप चार यांसारखे अनेक प्रकार आहेत. टाइप 1 विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. वैद्यकीय उपचार केलेल्या मुलाला टाईप एक विषाणूची बाधा झाली होती. टाईप दोन आणि चार यामध्ये अतिसार, ओटीपोटात दुखणे या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टरोलॉजी म्हणजे पोटाच्या विकाराशी संबंधित संसर्ग असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू प्रामुख्याने तीन वर्षांखालील मुलांना संक्रमित करतो. खोकला, सर्दी आणि श्वसनमार्गाचे संक्रमण ही लक्षणे दिसून येतात.