Health Tips : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. आणि या दिवसांत बहुतेकांना जाणवणारा त्रास म्हणजेच संधिवात. संधिवात हा शब्द दोन शब्दांनी जोडला गेला आहे. एक म्हणजे संधी आणि दुसरा वात. संधी म्हणजे जॉइंट. आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा जॉइंट दुखत असेल सूज येत असेल तर आपण त्याला संधीवात असे म्हणू शकतो. शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदाना होणं याला 'आर्थरायटीस' किंवा संधिवात म्हणतात. हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा हा आजार मानला जातो. मात्र, असे असले तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 


या संदर्भात डॉ. सारंग व्यवहारे (संधीवात तज्ज्ञ) म्हणतात की, संधिवात म्हणजे कोणत्याही प्रकारचा सांधा शरीरात अधिक काळ दुखत असेल तर तुम्हाला संधिवाताचा त्रास आहे असे समजा. 


संधिवाताचे प्रकार कोणते? 


संधिवाताचे असंख्य प्रकार आहेत. त्यापैकी Osteoarthritis, Rheumatoid Arthritis, Gout, असे अनेक प्रकारचे संधिवाताचे प्रकार काही लोकांना माहित आहेत. यामध्ये आढळणारा प्रीओलस संधिवात साधारण 15 ते 16 टक्के लोकांना आयुष्यात एकदा तरी संधिवात होऊन गेलेला आहे. प्रीओलन्स म्हणजे 100 लोकांच्या मागे 15 लोकांना आयुष्यात संधिवात झालेला आहे. 


संधिवातावर उपचार काय? 


जर तुम्हाला सांध्यांमध्ये त्रास जाणवला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संधिवात फक्त तुमच्या जॉईंट्समध्येच जात नाही तर तो तुमच्या संपूर्ण शरीरात पसरू शकतो. म्हणून याची विशेष काळजी घेतली पाहिजे. 


संधिवात टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी ?


1. संधिवात टाळण्यासाठी बॅलेन्स डाएट घेतलं पाहिजे. यामध्ये पालेभाज्या, प्रोटीन, कॅल्शियमयुक्त पदार्थांचा वापर केला पाहिजे. 


2. व्यायाम शरीरासाठी अत्यंत गरजेचा आहे. यासाठी रोज सकाळी व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे. 


3. रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे खूप गरजेचे आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर संधिवातावर मात करता येते. 


4. काही संधिवातावर वेळीच उपचार केले तर त्यावर मात करता येते. तर, काही संधिवातावर उशिराने उपचार केले तर शुगर, बीपी यांसारखे त्रास होतात. यासाठी जर तुम्हाला त्रास जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. 


पाहा व्हिडीओ : 



महत्वाच्या बातम्या : 


Measles Disease : गोवर हा संसर्ग नेमका काय आहे? गोवर संसर्गाची लक्षणे आणि उपचार कोणते? वाचा तज्ज्ञांचं मत