Banana Benefits : केळ्यांमध्ये (Banana Benefits) अनेक पोषक घटक असल्याने ती दररोज खायला हवीत. दररोज एक केळ खाल्याने वजन नियंत्रणात कमी करण्यास मदत होते. तर जास्त केळी खाल्ल्याने वजन वाढते. एकावेळी दोन तीन की चार केळी खायला हवीत? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? आज जाणून घ्या एकावेळी जास्तीत जास्त किती केळी खायला हवीत.
केळी खाण्याचे फायदे काय आहेत? (Benefits of Banana)
- केळी खाल्याने हाडे मजबूत होतात.
- नैराश्येपासून बचाव करण्यासाठी केळी फायदेशीर आहेत.
- कोरडा खोकला येत असेल तर एखादं केळ खावं.
- केळी खाल्यामुळे बीपी नियंत्रणात राहते.
- केळीमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते.
- केळ हृदयसाठी फायदेशीर आहे.
- केळ्याचे सालदेखील फायदेशीर आहे.
सकाळी उठल्यावर नाश्त्यादरम्यान केळ खाणं फायदेशीर असतं. केळ्यात पोषक घटक असण्यासोबत फायबर, व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियमदेखील असतं. हेल्थ एक्सपर्टच्या संशोधनानुसार,केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट आणि एनर्जी असते.
एकावेळी जास्तीत जास्त किती केळी खायला हवी? (How Many Bananas Eats At Once)
केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण अती जास्त प्रमाणात खेळी खाण्याचे तोटेही आहेत. योग्य प्रमाणात केळी खाल्ल्याने तुमचं वजन नियंत्रणात येतं. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे भुकेवर नियंत्रण आणण्यासाठी ते फायदेशीर ठरतात. दररोज किती केळी खावी याचा निश्चित आकडा नसला तरी प्रत्येक दिवशी फक्त एक ते दोन केळी खावी.
एका केळाने सदैव राहाल निरोगी
केळ्यांमधून पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि मॅगनीज 10 टक्के मिळते. केळी हृदयाचे आरोग्य राखते. केळी खाण्याचे भरपूर फायदे आहेत. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी ब्रेकदरम्यान केळ खायला हवं. दररोज एक केळ खाल्ल्याने माणूस सदैव निरोगी राहू शकतो. त्वचा तेजस्वी करण्यासाठी केळी खाणं गरजेचं आहे. केळी खाल्ल्याने त्यामध्ये असलेले पोटॅशियम तुमच्या शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करते. यामुळे तुमच्या त्वचेच्या सर्व पेशींना भरपूर ऑक्सिजन आणि पोषण मिळते.
'हा' आजार असेल तर केळी खाऊ नका
केळी खाणं सर्वांसाठी फायदेशीर नाही. मधुमेह, दमा, ब्रांकायटिस, खोकला आणि मायग्रेनचा त्रास असणाऱ्या मंडळींनी केळी खाऊ नयेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या