Banana Benefits in Winter : तुम्ही हिवाळ्यात केळी खाता का? जाणून घ्या रोज सकाळी खाण्याचे फायदे
हिवाळ्यात केळी खाऊ नयेत असे अनेक लोक म्हणतात. मात्र, या ठिकाणी आम्ही तुम्हाला हिवाळ्यात केळी खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात केळी खाल्ल्याने त्वचेवर तेजस्वी चमक येते.
केळीमध्ये भरपूर पोटॅशियम आढळते. दुसरीकडे, जर तुम्ही हिवाळ्यात कमी पाणी प्याल तर हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण करेल.
या फळामध्ये असलेल्या 100 कॅलरीजमुळे शरीराला ऊर्जा मिळते.
केळी खाल्ल्याने त्यामध्ये असलेले पोटॅशियम तुमच्या शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करते. यामुळे तुमच्या त्वचेच्या सर्व पेशींना भरपूर ऑक्सिजन आणि पोषण मिळते.
केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम त्वचेतील कोलेजनची पातळी वाढवण्यासही मदत करते.
जर तुम्ही रोज एक केळी खाल्ले तर बाहेर पार्लरमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. तुमची त्वचा आतून चमकदार होईल.
केळी खाल्ल्याने त्वचा नैसर्गिक पद्धतीने मुलायम होते. पोटॅशियमसोबतच केळीमध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन-सी देखील असते.
व्हिटॅमिन-सी त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही केळी खाऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.