Health Insurance : अनपेक्षित आरोग्यसेवा खर्चापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आरोग्य विमा (Health Insurance ) ही एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. एकाच वेळी आणि एकाच वर्षात कुटुंबातील अनेक सदस्य गंभीरपणे आजारी पडू शकतात, असे चित्र गेल्या दोन वर्षांत दिसून आले आहे. आरोग्य उपचारांचा खर्चही (Hospital Bill) गगनाला भिडलेला आहे. त्यामुळे तरुणांनी स्वत:च्या गरजा आणि अंदाजपत्रकाला साजेशी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करणे शहाणपणाचे ठरेल.  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे सीईओ राकेश जैन यांनी तरुणांना आरोग्य विमा खरेदी करणं गरजेचं का आहे, याबाबत माहिती दिली आहे. 


तरुण आणि निरोगी असताना आरोग्य विमा योजना निवडण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेतः


• कमी प्रीमियम :


 विमाधारकाचे सध्याचे वय आणि विद्यमान आजारांच्या आधारे विमा प्रीमियम आकारला जातो. त्यामुळे, तरुण असताना आणि कोणत्याही आजारांशिवाय पॉलिसी खरेदी केल्याने तुम्हाला कमी प्रीमियम मिळेल. 


• व्यापक संरक्षण :


मोतीबिंदू आणि गुडघा बदलणे यासारख्या काही आजारांसाठी अनिवार्य प्रतीक्षा कालावधी तरुण पॉलिसीधारकांसाठी कमी असेल. तथापि, तुम्ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी देखील तपासला पाहिजे, जो IRDAच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार 48 महिन्यांपेक्षा जास्त नसावा.


• अधिक लवचिकता :


 कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीप्रमाणे, सामान्यतः रु. 3-5 लाख रुपयांची विमा रक्कम आणि अनेक अपवाद किंवा सह-देयके उपलब्ध असतात, जरी तुम्ही नोकरी बदलली किंवा थांबवली तरीही तुमची वैयक्तिक आरोग्य सेवा पॉलिसी सक्रिय असेल. त्यामुळे, वैद्यकीय महागाईची चिंता न करता, स्वत:साठी आणि तुमच्या कुटुंबासाठी दर्जेदार आरोग्य सेवेची खातरजमा राहते, तुम्ही वैयक्तिक/ कौटुंबिक आरोग्य विम्यात गुंतवणूक करू शकता. 


प्रथम खरेदीदार म्हणून तुम्ही वैयक्तिक/ कौटुंबिक आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना काही गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. काही घटक पुढीलप्रमाणे: 


• विम्याची रक्कम :


विम्याची रक्कम शक्यतो तुमचा पगार, तुम्ही राहता ते शहर आणि कौटुंबिक आजारांच्या इतिहासावर अवलंबून असावी. तथापि, वाढता वैद्यकीय खर्च, तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे वय आणि आरोग्य स्थिती, तुमच्या कुटुंबातील सदस्यांची जीवनशैली आणि सवयी आणि उत्पन्नाच्या किंवा बचतीच्या इतर स्त्रोतांची उपलब्धता यांचा देखील विचार केला पाहिजे. सर्वसाधारण नियम असा आहे की तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 पट विमा रक्कम असणे आवश्यक आहे.


• इतर वैशिष्ट्ये : 


तुम्ही क्लेम सेटलमेंट रेशो, को-पेमेंट क्लॉज, सब-लिमिट, नो-क्लेम बोनस, पोर्टेबिलिटी ऑप्शन आणि विमा कंपन्यांची ग्राहक सेवा यासारख्या इतर वैशिष्ट्यांकडे देखील पाहिले पाहिजे. ही वैशिष्ट्ये तुमच्या आरोग्य विम्याच्या अनुभवाच्या गुणवत्तेवर आणि सोयीवर परिणाम करू शकतात.


तुम्हाला जास्तीत जास्त संरक्षण देणारे आरोग्य विमा कवच निश्चित करण्यापूर्वी मोठे किंवा लहान स्वरुपांच्या सर्व पैलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे.