मुंबई: अलिकडच्या धाकधुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचं दिसतंय. विशीतील आणि तिशीतील तरूणांमध्येही हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे. हृदयविकार म्हणजे हर्ट अटॅकमध्ये हृदयातील रक्ताभिसरण कमी होऊन थांबते आणि हृदयविकाराचा झटका येतो. पण हृदयविकाराचा झटका येण्याआधी, शरीर आधीच त्याचे संकेत देत असतं. पण अनेकांना त्याबद्दल माहिती नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होतं आणि ते धोकादायक ठरू शकतं. शरीराच्या अनेक भागांवर तसेच चेहऱ्यावर हृदयविकाराची चिन्हे दिसतात. हे वेळीच ओळखले तर हृदयविकाराचा धोका टळू शकतो.


हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसणारे 5 संकेत


1. चेहऱ्यावर सूज येणे


एखाद्याच्या चेहऱ्यावर विनाकारण सूज येत असेल तर सावध व्हायला हवे. हे हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत असू शकते. जेव्हा हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही तेव्हा शरीरात द्रव जमा होऊ लागते. त्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते.


2. डोळ्यांजवळ कोलेस्टेरॉल जमा होणे


जर डोळ्यांखाली आणि पापण्यांजवळ कोलेस्टेरॉल जमा झाले असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. हलक्या पिवळ्या रंगाचे पदार्थ डोळ्यांभोवती जमा होऊ लागतात. त्याला Xanthelasma असेही म्हणतात. यामुळे हृदय, मेंदू आणि इतर अनेक अवयवांपर्यंत रक्त पोहोचण्यापासून रोखलं जातं. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.


3. चेहऱ्याच्या डाव्या बाजूला वेदना


चेहऱ्याच्या डाव्या बाजूला वेदना किंवा बधीरपणा येणे ही गोष्टदेखील हृदयविकाराच्या झटक्याचा इशारा असू शकते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला बराच काळ वेदना आणि बधीरपणा येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जा आणि ताबडतोब डॉक्टरांना भेटा.


4. चेहरा निळा-पिवळा होत आहे


चेहऱ्याचा रंग अचानक निळा किंवा पिवळा झाला तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. जेव्हा हृदय योग्यरित्या कार्य करू शकत नाही, तेव्हा पुरेसा ऑक्सिजन असलेले रक्त शरीराच्या काही भागांमध्ये पोहोचत नाही. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.


5. क्रॅक्ड इअरलोब


इअरलोब क्रिज म्हणजे कानाच्या पाळ्यांवर तडे येणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. एका अभ्यासानुसार, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असलेल्या लोकांमध्ये इअरलोब क्रीज जास्त दिसून येते. असं असलं तरी हे हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य लक्षण आहे असं नाही. परंतु प्रत्येक वेळी डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.


Disclaimer : बातम्यांमध्ये दिलेली काही माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणतीही सूचना अंमलात आणण्यापूर्वी आपण संबंधित तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


ही बातमी वाचा: