Healthy Food : नवीन वर्ष (New Year 2024) म्हणजे पार्टी, मजा आणि उत्साह…पण तेच घरगुती खाण्याबद्दल आपल्याला वाटत नाही. घरगुती पदार्थ किती जरी पौष्टिक असले तरी ते आपल्याला चविष्ट लागत नाहीत. मात्र, आता नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. अशातच आपण निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचा धोका असतो. 2024 मध्ये तुम्ही कोणते आरोग्यदायी पदार्थ खाऊ शकता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. 2023 हे वर्ष आता जाईल परंतु येणाऱ्या वर्षात तुम्ही आहारात नक्कीच चांगले बदल करू शकता. 2024 मध्ये तुम्ही तुमच्या आहारात काय समाविष्ट केले पाहिजे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
आपल्या आहारात बाजरीचा समावेश करा
पोषणतज्ञ अपूर्वी सेठ यांच्या म्हणण्यानुसार, भारत सरकार देखील बऱ्याच काळापासून आहारात बाजरीचा समावेश करण्याचा सल्ला देत आहेत. दुधाप्रमाणेच बाजरी हे एक सुपरफूड म्हणून गणले जाते. प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यापर्यंत बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
कमी फॅटयुक्त ग्रीक दही
विशेषत: वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये ग्रीक दही खूप लोकप्रिय आहे. त्यात लॅक्टोजचे प्रमाणही कमी असते. ग्रीक दह्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस, प्रथिने, कॅलरीज, व्हिटॅमिन बी 12 आणि आयोडीन यासह अनेक गोष्टी असतात.
रताळे
तुम्ही आहारात बटाट्याऐवजी रताळ्यांचा आहारात समावेश करा. कारण बटाट्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका जास्त असतो. त्यात बीटा कॅरोटीन नावाचे संयुग असते. त्यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो.
नट्स सॅलड
न्यूट्रिशनिस्ट अपूर्वी सेठ सांगतात की, नवीन वर्षात निरोगी जीवनशैलीचा संकल्प करा. तुमच्या सॅलड किंवा स्नॅक्समध्ये नट आणि बियांचा समावेश जास्तीत जास्त करा. त्यातील हेल्दी फॅट्स शरीरासाठी फायदेशीर असतात. अक्रोड, बदाम आणि काजू अनेक जीवनसत्त्वे देतात, जे शरीराला अनेक प्रकारे निरोगी बनवतात.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.